घरक्रीडासुनील गावस्कर यांनी ३५ मुलांच्या सर्जरीचा उचलला खर्च

सुनील गावस्कर यांनी ३५ मुलांच्या सर्जरीचा उचलला खर्च

Subscribe

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आज ७१ वर्षाचे झाले आहेत. वाढदिवसानिमित्ताने लिटिल मास्टर गावस्कर यांनी ग्रेट काम केले आहे. गावस्कर यांनी ३५ मुलांच्या हृदयावर होणाऱ्या सर्जरीचा खर्च उचलला आहे. गेल्या वर्षी देखील गावस्कर यांनी असेच ग्रेट काम केले होते. त्यावेळेस त्यांनी ३४ मुलांच्या हृदयावर होणाऱ्या सर्जरीचा खर्च उचलला होता. गेल्या वर्षी नवी मुंबईतील श्री सत्य साई संजीवनी इंटरनेशनल सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरच्या उद्धघटना कार्यक्रमा दरम्यान लिटिल मास्टर गावस्कर यांनी हा संकल्प हाती घेतला होता.

सुनील गावस्कर यांनी भारताकडून ३५ शतकं झळकावताना सर डॉन ब्रॅडमन यांचा शतकांचा विक्रम मोडला होता. त्यामुळे त्यांनी ३५ मुलांच्या सर्जरीचा खर्च उचलला आहे. यानिमित्ताने आज त्यांनी नवी मुंबईच्या श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलला भेट दिली. ज्या मुलांचे आई-वडील सर्जरीचा खर्च करू शकत नाही अशा मुलांना गावस्कर मदत करतात.

- Advertisement -

यापूर्वी सुनील गावस्कर यांनी कोरोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. त्यांनी एकूण ५९ लाखांची मदत केली होती. यापैकी ३५ लाख हे पीएम रिलीफ फंडात दिले होते. तर २४ लाख रुपये सीएमओ महाराष्ट्राच्या फंडमध्ये दिले होते. गावस्कर हे कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे पहिले फलंदाज, कसोटीच्या दोन्ही डावांत तीन वेळा शतक झळकावणारे पहिले फलंदाज आहेत. तसेच गावस्कर यांच्या नावावर २००५ पर्यंत सर्वाधिक कसोटी शकतांचा विक्रम होता. तर कसोटीत १०० झेल टिपणारे पहिले भारतीय क्षेत्ररक्षक इत्यादी अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत.


हेही वाचा – अनुष्काचे फोटोशूट पाहून विराट झाला ‘क्लीन बोल्ड’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -