घरटेक-वेकआला रे आला 5G आला

आला रे आला 5G आला

Subscribe

2G त्यानंतर 3G आणि सध्या वापरात असलेल्या 4G ने सगळ्यांचे आयुष्य सुखकर करुन ठेवले आहे. फास्ट इंटरनेटचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. पण नव्या मोबाईल्समध्ये लाईटनिंग फास्ट इंटरनेट मिळणार आहे.

4G वापरणाऱ्यांनो थोडसं थांबा कारण तुमचा इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी लवकरच 5G येत आहे. हो तुम्ही वाचत आहात ते अगदी खरं आहे. कारण २०१९च्या ऑगस्ट महिन्यात तुमच्या- आमच्या सेवेत 5G दाखल होणार आहे. या संदर्भातील घोषणा टेलिकॉम सचिव सुंदराराजन यांनी सोमवारी केली आहे. ट्रायने या संदर्भातील प्राथमिक सूचना दिल्या आहेत. त्यावर ट्रायचे काम सध्या सुरु आहे.

‘OnePlus’ च्या नव्या फोनमध्ये 5G इंटरनेट

पुढील वर्षी येणार 5G

2G त्यानंतर 3G आणि सध्या वापरात असलेल्या 4G ने सगळ्यांचे आयुष्य सुखकर करुन ठेवले आहे. फास्ट इंटरनेटचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. पण नव्या मोबाईल्समध्ये लाईटनिंग फास्ट इंटरनेट मिळणार आहे. पण 5Gसाठी लागणारा पैसा जमवणे सुरु असून त्यासाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. यासाठी ४.९ लाख कोटीचा खर्च येणार आहे. त्यामुळे साधारणत: जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ही 5G सर्व्हिस येणार आहे.

- Advertisement -
इंटरनेट स्पीड वाढवणारं इस्रोचं नवं यान अंतराळात झेपावणार!

तातडीने होईल अंमलबजावणी

5G ची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार आहे. पण संपूर्ण देशात एकाचवेळी ही सुविधा उपलब्ध होणार नाही. तर टप्प्या टप्प्याने ही सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सगळ्या मोबाईल नेटवर्क कंपनी या सुविधा पुरवणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -