घरटेक-वेक'या' Apps च्या मदतीने बनवा 'टाईम लॅप्स' व्हिडिओ

‘या’ Apps च्या मदतीने बनवा ‘टाईम लॅप्स’ व्हिडिओ

Subscribe

या अॅप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरुन किंवा अँड्रॉईड फोनवरुन टाईम लॅप्स व्हिडिओ बनवू शकता.

आपण बरेचदा असे व्हिडिओ पाहतो ज्यामध्ये एखादी वस्तू किंवा माणूस एकाजागी स्थिर असतो, पण त्याच्या आजूबाजूच्या किंवा पाठीमागच्या गोष्टी वेगाने हलत असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास वेगाने होणारा सूर्योदय, सूर्यास्त किंवा रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या किंवा मग वेगाने पुढे-पुढे सरकणारे ढग. अशाप्रकारच्या व्हिडिओंना ‘टाईम लॅप्स’ व्हिडिओ म्हटलं जातं. काही चित्रपटांमध्येही तुम्ही अशाप्रकारची दृष्य पाहिली असतील. तुम्हीसुद्धा असे भन्नाट टाईम लॅप्स व्हिडिओ अगदी सहज बनवू शकता. यासाठी खूप मोठं किंवा कठीण तंत्रज्ञान वापरण्याची गरज नाही. तुमच्या स्मार्टफोनवरुन किंवा अँड्रॉईड फोनवरुनही तुम्ही हे व्हिडिओ बनवू शकता. सध्या नव्याने येणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये मुळातच टाईम लॅप्स व्हिडिओच्या ऑप्शन इनबिल्ट असतो. मात्र, तुमच्या मोबाईलमध्ये हा ऑप्शन नसल्यास तर नाराज होऊन जाऊ नका. आम्ही तुम्हाला अशा काही Apps ची नावं सांगणार आहोत, ज्या अॅपच्या मदतीने तुम्ही अगदी सहज टाईम लॅप्स व्हिडिओ बनवू शकता. गुगल प्ले स्टोअरवरुन तुम्ही अॅप डाऊनलोड करुन त्याद्वारे टाईम लॅप्स व्हिडिओ शेअर करु शकता. पाहा यातील कोणतं अॅप तुमच्या स्मार्टफोनला सूट करतं ते. जाणून घ्या कोणती आहेत ही अॅप्स :

  • Framelapse

  • Lapse It

  • Microsoft Hyperlapse

  • Hyperlapse from Instagram

  • TimeLapse

  • iTimeLapse Pro

  •  iMotion

  • OSnap!


कसा बनवाल हा व्हिडिओ?

अशाप्रकारचा व्हिडिओ बनवताना सर्वप्रथम तुम्हाला नेमकं कशाचं शूटिंग करयाचं ते नक्की ठरवा, त्यानुसार तुम्हाल व्हिडिओची रुपरेषा ठरवता येईल. त्यानंतर अॅपच्या ज्या ऑब्जेक्टवर तुम्हाला फोकस करायचा अर्थात जी वस्तू तुम्हाला स्थिर हवी आहे ती सिलेक्ट करा आणि त्यानंतर उरलेली फ्रेम टाईम लॅप्समध्ये शूट करा. फोन हातात धरून शूट करताना तो शेक होण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी तुमचा व्हिडिओ खराब होऊ शकतो. त्यामुळे जमल्यास ट्रायपॉड किंवा फोन स्टँडचा वापर करा, जेणेकरुन तुमचा व्हिडिओ अधिक परफेक्ट होईल.

वाचा: फेसबुकवरुनही करा आता सेंट मेसेज Delete

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -