घरटेक-वेकबजाजची नवीन स्वस्त बाईक लाँच

बजाजची नवीन स्वस्त बाईक लाँच

Subscribe

बजाज ऑटोने नवीन CT110 मॉडल भारतात लाँच केले असून, त्यामध्ये 100CC इंजिन दिले आहे. कंपनीने नवीन CT बाईकमध्ये पॉवरफुल इंजिन दिलं आहे. तसेच या बाईकच्या स्टाईलमध्येही बदल केले आहेत.आता या CT110 मध्ये 150CC चे इंजिन दिले असून, इंजिन 8.6PS पॉवर व 9.81Nm टॉर्क निर्माण करते. बाईकमध्ये 4 स्पीड गिअर दिले आहे. उत्तम राईड क्वॉलिटी, शानदार परफॉर्मन्स आणि सर्वोत्कृष्ट मायलेज देईल, असा दावा कंपनी करत आहे. किक स्टार्ट व्हेरिअंटची किंमत फक्त 37 हजार, 997 रुपये आहे. इलेक्ट्रॉनिक स्टार्ट व्हेरिअंटची किंमत 44 हजार 480 रुपये असणार आहे. नवीन CT110 तीन रंगांत उपलब्ध होती.या बाईकची लांबी 194 मिमी, रुंदी 752 मिमी, उंची 1072 मिमी, ग्राऊंड क्लेरेंस 170 मिमी आणि व्हीलबेस 1235 मिमी आहे. बाईकचे वजन 116 किलोग्रॅम आहे. ब्रेकिंगसाठी बाईकच्या दोन्ही टायर्समध्ये 130 मिमीचे ब्रेक लावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -