घरटेक-वेकफेसबुकने पहिल्यांदाच सुरु केले 'हे' फीचर

फेसबुकने पहिल्यांदाच सुरु केले ‘हे’ फीचर

Subscribe

फेसबुकने युजर्ससाठी एका नवीन फीचरची सुरूवात केली आहे. या फीचरमुळे युजर्सला फेसबुकवर किती वेळ घालवला या बद्दल माहिती मिळणार आहे.

फेसबुक आज जागातील सर्वात मोठे सोशल मीडिया म्हणून ओळखले जाते. फेसबुक कपंनी आपल्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी फेसबुकमध्ये बदल करत असते. दिवसों दिवस फेसबुकचे युजर्स वाढत चालले आहेत. या युजर्समध्ये तरुणांचा मोठा टक्का आहे. सुरुवातीला फेसबुकचा वापर हा मॅसेज पाठवण्यासाठी केला जात होते. मात्र आता अनेक फेसबुक युजर्स आपला अधिक वेळ फेसबुकच्या पोस्ट बघण्यात घालवतात. फेसबुकवर पोस्टवर टाकलेल्या पोस्ट किंवा शेअर केलेले व्हिडियो युजर्सला बघणे आवडते. व्हिडिओ आणि फोटोंंना युजर्सने चांगलाच प्रतिसाद दिला आहे. नुकत्याच केलेल्या एका निरिक्षणानुसार ६० टक्क्यांहून अधिक युजर्स आपल्या दिवसातील अधिक वेळ फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर घालवतात. एक युजर्स दिवसभरातून ३ हजार वेळा आपल्या मोबाईलचे लॉक बटन दाबतो. फेसबुकने सुरु केलेल्या या फीचरमुळे युजर्सला आपण कितीवेळ फेसबुक वापरतो याची माहिती मिळेल.

कसे आहे नवे फीचर

“Your Time on Facebook” असे या फीचरचे नाव आहे. हे फीचर युजर किती वेळ फेसबुकवर घालवतो याची माहिती देतो. युजर्सला ही माहिती दर दिवशी मिळू शकते. हे फीचर फेसबुकच्या सेटिंग्समध्ये नोटिफिकेशन मध्ये असणार आहे. फीचर सिलेक्ट केल्यावर दिवसभारतून कितीवेळ फेसबुकवर घालवला याची माहिती समोरच युजर्सला बघायला मिळेल. येत्या काळात फेसबुक बरोबरच इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरही असा फीचर येणार असल्याचे सांगितले जात आहे. फेसबुक वापरते वेळी आपण वेळ बघत नाही म्हणून अनेक जण फेसबुक व्यसनी झाले आहेत. सोशल मीडियाचा वापर अधिक केल्यामुळे अनेक युजर्सला माणसीक आजार झाले आहेत. त्यामुळे हा फीचर येत्या काळात युजर्सला उपयोगी पडणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -