घरटेक-वेकतुमचं जीमेल अजिबात सुरक्षित नाही, गुगलनी दिली कबुली

तुमचं जीमेल अजिबात सुरक्षित नाही, गुगलनी दिली कबुली

Subscribe

लोकप्रिय जीमेलच्या सुरक्षा धोरणांमधील एक गंभीर बाब समोर आली आहे. थर्डपार्टी सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना युजर्सचे ई-मेल्स वाचण्याचा अधिकार गुगलने दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने हा प्रकार समोर आणला असून गुगलने सुद्धा हि गोष्ट मान्य केली आहे.

जीमेलच्या सेटिंग्जमध्ये थर्ड पार्टी डेव्हलपर्सना आपले ई-मेल वाचण्याची परवानगी देण्यात येते. या संदर्भात एक स्क्रीन शॉट व्हायरल झाला आहे. त्यामध्ये युजरचा आयडी, त्याला ज्या व्यक्तीकडून ई-मेल आला त्याचा आयडी आणि संपूर्ण मेल दिसतोय.

- Advertisement -

हा सर्व प्रकार उघड झाल्यावर गुगलने आम्ही केवळ अनुभवी आणि व्हेरिफाइड डेव्हलपर्सना असे अधिकार दिल्याची कबुली दिली. या डेव्हलपर्सची आपण स्वतः पडताळणी करत असून त्या नंतरच त्याना आपण मेल वाचायची परवानगी देत असल्याची माहिती गुगलनी दिली आहे .ही माहिती देण्याची परवानगी यूजर देतो असा दावाही गुगलने केला आहे.

हे थर्डपार्टी डेव्हलपर्स अॅप बनविण्यासाठी युजर्सचे अकाउंट अॅक्सेस करू शकतात
रिटर्न पाथ आणि एडिसन सॉफ्टवेअर या कंपन्याना यूजर्सचे मेल वाचायची परवानगी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे . तसेच यानंतर या माहितीचा वापर कोणत्याही प्रकारे करण्याची परवानगी दिली आहे.यामुळे जीमेलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

आम्ही खासगी कंपन्यांना जीमेलची माहिती वापरण्यास मनाई केल्याचे गुगलने मागच्या वर्षी स्पष्ट केले होते. तरीसुद्धा हा प्रकार उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गुगल आपल्याकडून ही परवानगी कधी घेते, हे जीमेल वापरणाऱ्या अब्जावधी युजर्सना माहिती नसल्याचे समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -