घरटेक-वेकभारतात Mi Air Purifier 2C लाँच; 'हे' आहेत फीचर्स

भारतात Mi Air Purifier 2C लाँच; ‘हे’ आहेत फीचर्स

Subscribe

Mi इकोसिस्टम प्रोडक्टच्या अंतर्गत एमआय एयर प्यूरीफायर 2C भारतात लाँच

बुधवारी xiaomi ने भारतात झालेल्या इव्हेंट सोहळ्यात नव्या स्मार्टफोनसह नव्या होम प्रोडक्टचेहा लाँचिंग केले. या कार्यक्रमात कंपनीने Mi इकोसिस्टम प्रोडक्टच्या अंतर्गत एमआय एयर प्यूरीफायर 2C लाँच केले. हे प्यूरीफायर भारतामध्ये फक्त भारतीयांकरिता डिझाईन केले आहे. याची किंमत ६ हजार ४९९ रूपये आहे. Mi Air Purifier आणि Mi Air Purifier 2S च्या नंतर Xiaomi कंपनीने हे तिसरे एअर प्यूरीफायर लाँच केले आहे.

असे आहेत फीचर्स

Mi Air Purifier 2C ला HEPA फिल्टर आणि रियल-टाइम एयर क्वालिटी इंडीकेटरचे वैशिष्ट्यांनी मार्केटमध्ये सादर केले आहे. हे प्यूरीफायर 2C डुअल फिल्ट्रेशनशिवाय ४५२ स्क्वेयर फूटचा एरिया कवर करतो. शाओमीने असा देखील दावा केला आहे की, वन-बटन कंट्रोलच्या मदतीने ग्राहक १० सेकेंड पेक्षा कमी वेळात Mi Air Purifier 2C चे फिल्टर चेंज करू शकतो, अशी सोय यामध्ये आहे. प्यूरीफायर फक्त १० मिनिटांत क्लिअर करते. यामध्ये ट्रू HEPA फिल्टर असल्याने ९९.९७ टक्के इनडोर प्रदूषणला दूर करू शकतो.

- Advertisement -

भारतातील Mi Air Purifier 2C ची किंमत

भारतातील मार्केटमध्ये Mi Air Purifier 2C ची किंमत ६ हजार ४९९ रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. या प्रोडक्टची विक्री कंपनीने अधिकृत संकेतस्थळावर mi.com वर सुरू केली आहे. Amazon, Flipkart आणि mi store वर याची विक्री १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -