भारतात 5,000mAh बॅटरीसह Moto G8 Power Lite लाँच

Mumbai
moto g8 power light
भारतात 5,000mAh बॅटरीसह Moto G8 Power Lite लाँच

Moto G8 Power Lite स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. या महिन्याच्या अखेरीस त्याची विक्री सुरू केली जाईल. एप्रिलमध्ये या फोनला जागतिक स्तरावर लाँच करण्यात आलं. या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि ऑक्टा-कोर MediaTek Helio P35 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Moto G8 Power Lite फक्त 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलं आहे. फोनची किंमत ८,९९९ रुपये आहे. २९ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून त्याची विक्री होईल. फ्लिपकार्टवरून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. आर्कटिक ब्लू आणि रॉयल ब्लू कलर ऑप्शन्समध्ये हा फओन उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर यासाठी काही ऑफरही जारी करण्यात आल्या आहेत. हा स्मार्टफोन खरेदी करून ग्राहकांना फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के अमर्यादित कॅशबॅकचा लाभ मिळणार आहे. तसेच, काही ईएमआय सुविधा देखील आहेत.

Moto G8 Power Liteचे स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाईवर चालतो आणि ६.५ इंचाची एचडी प्लस (720×1,600 पिक्सेल) IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 4GB रॅमसह MediaTek Helio P35 प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी त्याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 16MPचा आहे. याशिवाय 2MPचा मॅक्रो कॅमेरा, 2MPचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 8MPचा कॅमेरा देण्यात आला आहे. Moto G8 Power Liteची इंटर्नल मेमरी 64GB आहे आणि कार्डच्या मदतीने ती 256GBपर्यंत वाढवली जाऊ शकते.


हेही वाचा – 5G सपोर्टसह Honor X10 लाँच, मिळणार पॉपअप सेल्फी कॅमेरा


याची बॅटरी 5000mAh असून 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, यात 4G LTE, v4.2, Wi-Fi 802.11 b/g/n, GPS/A-GPS, मायक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सपोर्ट आहे. मागच्या बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.