घरटेक-वेकOnePlus 8T ऑक्टोबरमध्ये होणार लाँच; जाणून घ्या फीचर्स

OnePlus 8T ऑक्टोबरमध्ये होणार लाँच; जाणून घ्या फीचर्स

Subscribe

स्मार्टफोन कंपनी OnePlus लवकरच OnePlus 8T स्मार्टफोन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच करणार आहे. हा फोन ११ बेस्ड OxygenOS 11 अपडेटसह लाँच केला जाणार आहे. लाँचिंगच्या आधी OnePlus 8T ला भारतीय मानक ब्यूरोने प्रमाणपत्र दिलं आहे. यामुळे हा फोन लवकरच बाजारात येणार असल्याची चर्चा आहे.

Gizmochina च्या अहवालानुसार OnePlus 8T ला मॉडेल क्रमांक KB2001 सह सूचीबद्ध करण्यात आलं आहे. डिव्हाइसला Kebab कोडनेमसह सादर करण्यात आलं आहे. फोनमध्ये 120Hz रीफ्रेश रेटसह ६.५५ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. अहवालानुसार OnePlus 8T ला चार कॅमेरे देण्यात आले आहेत. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा असेल. या व्यतिरिक्त 16MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5MP मायक्रोलेन्स आणि 2MP पोर्ट्रेट लेन्स देण्यात येणार आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर OnePlus 8T ला स्नॅपड्रॅगन 865 प्लस चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. फोन 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज देण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -