घरटेक-वेकओप्पोने लाँच केला के-३ पॉप-अप कॅमेरा फोन

ओप्पोने लाँच केला के-३ पॉप-अप कॅमेरा फोन

Subscribe

ओप्पो के ३ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला असून यात पॉप-अप सेल्फी कॅमेर्‍यासह अनेक सरस फिचर्स आहेत.अलीकडच्या काळात पॉप-अप या प्रकारातील सेल्फी कॅमेर्‍यांनी युक्त असणारे स्मार्टफोन प्रचलीत होत असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने ओप्पो के ३ या मॉडेलमध्येही याच प्रकारचा कॅमेरा दिलेला आहे. याला ६ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे १६,९९० आणि १९,९९० रूपये मूल्यात सादर करण्यात आले आहे. हे दोन्ही व्हेरियंट नेब्युला पर्पल, मॉर्नींग व्हाईट व सेक्रेट ब्लॅक या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून २३ जुलैपासून उपलब्ध करण्यात येणार आहेत.

वर नमूद केल्यानुसार यात १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असून हा पॉप-अप या प्रकारात वर येऊन सेल्फी व व्हिडीओ कॉलींगसाठी वापरता येणार आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यामध्ये १६ आणि २ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्यांसा समावेश असून याच्या मदतीने दर्जेदार प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -