घरटेक-वेकपबजी नंतर आता Tik Tok ची देखील भारतात होणार एंट्री

पबजी नंतर आता Tik Tok ची देखील भारतात होणार एंट्री

Subscribe
PUB Mobile आणि TikTok हे दोन जबरदस्त लोकप्रिय असलेल्या चायनीज App वर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. १२ नोव्हेंबर रोजी दक्षिण कोरियाची कंपनीने जाहीर केले की PUBG Corporation भारतात लवकरच PUBG MOBIE INDIA लाँच करण्याची तयारी करत आहे. पबजी सोबतच असंख्य भारतीय तरूण टिक टॉक app पुन्हा सुरु होण्याची वाट पाहत होते. टिक टॉकच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  PUBG नंतर आता Tik Tok ही भारतात परतण्याच्या विचारात आहे.  टिक टॉकच्या निर्माता कंपनीला आशा आहे की, भारत सरकारसोबत चर्चा केल्यानंतर टिक टॉकवरील बंदी उठू शकते.
Tik Tok इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी भारतातील टिक टॉक कर्मचार्‍यांना एक ईमेल पाठवला आहे. ज्यामध्ये त्यांनी टिक टॉक लवकरच भारतात पुन्हा सुरु होणार असल्याची आशा व्यक्त केली आहे. टिक टॉक भारतात पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान टिक टॉकची मुळ कंपनी Bytedance मध्ये भारतातील काही कर्मचारी काम करत आहेत. टिक टॉक आणि Helo App साठी भारतात जवळपास २००० कर्मचारी काम करतात. बाईटडान्सने या सर्व कर्माचाऱ्यांना यंदा बोनसही जाहीर केला आहे. त्यामुळे हे दोन्ही Apps भारतात नक्कीच पुनरागमन करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
टिक टॉक आणि हेलो App बंद झाल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलेले नाही. उलट त्यांच्या उत्तम कामासाठी कंपनीकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. दोन्ही App आज ना उद्या सुरु होतील, यासाठीच कंपनीने आपले कर्मचारी जपले आहेत. PUBG India च्या बाबत बोलायचे झाल्यास पबजी चीनी कंपनीशिवाय भारतात येणार आहे. मात्र TikTok ने आतापर्यंत चीन व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशातल्या कंपनीसोबत करार केलेला नाही. भारतात देखील त्यांनी आतापर्यंत कुणाशीही भागीदारी केलेली नाही.
Tik Tok इंडिया च्या प्रमुखांनी सांगितले की, आम्ही स्थानिक कायद्यांचा आदर करतो. डेटा सुरक्षा आणि प्रायव्हसीबाबत आम्ही गंभीर आहोत. सरकारला आमच्याकडून पुर्ण सहकार्य केले जाईल. आमचे कर्मचारी देखील युझर्स आणि क्रिएटर्स यांच्याप्रती समर्पक भावनेने काम करत आहेत. सरकारकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. अशी अपेक्षा Tik Tok ने वर्तवली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -