घरटेक-वेक१४ जुलैला लाँच होणार रियलमीचा बजेट स्मार्टफोन

१४ जुलैला लाँच होणार रियलमीचा बजेट स्मार्टफोन

Subscribe

Realme C11 १४ जुलैला भारतात लाँच होणार

रियलमी या स्मार्टफोन कंपनीचा Realme C11 बजेट स्मार्टफोन भारतात मंगळवारी १४ जुलैला लाँच केला जाणार आहे. याबाबतची माहिती कंपनीने दिली. या फोनला 5000mAh बॅटरीसह रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे असून ही या फोनची खास बाब आहे. शिवाय, त्याची डिझाईन देखील नवी आहे.

Realme C11 डिजिटल लाँचिंग इव्हेंटच्या माध्यमातून लाँच केला जाणार आहे. लाँचिंग कार्यक्रम येत्या १४ जुलैला दुपारी १ वाजता सुरु होणार आहे. Realme C11 ची किंमत सध्या जाहीर केलेली नाही. मात्र, मलेशियात असलेल्या किमतीच्या आसपास असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मलेशियामध्ये, 2GB + 32GB व्हेरिएंटची किमत MYR 429 (जवळपास ७,५०० रुपये) एवढी आहे. त्यामुळे भारतातही १० हजाराच्या आत या फोनची किमत असेल.

- Advertisement -

Realme C11 च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचं तर हा अँड्रॉइड १० बेस्ड Realme UI वर चालतो. फोनला ६.५ इंचाचा HD+ (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 2GB रॅमसह MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 13MP चा आहे आणि सेकंडरी कॅमेरा 2MP चा आहे. सेल्फीसाठी 2MP कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला 5000mAh बॅटरीसह रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -