घरटेक-वेकJio ने बंद केले त्यांचे स्वस्तातले 'हे' चार प्लान; जाणून घ्या

Jio ने बंद केले त्यांचे स्वस्तातले ‘हे’ चार प्लान; जाणून घ्या

Subscribe

ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या प्लानमध्ये कोणते फायदे दिले जात आहेत हे जाणून घ्या...

सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक ग्राहक असलेल्या रिलायन्स जिओने जिओ फोनचे चार प्लान रद्द केले आहे. हे चार रद्द झालेले प्लान 99 रुपये, 153 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपयांचे नॉन-जिओ व्हॉईस कॉलिंग प्लान होते. कंपनीच्या 99 रुपये, 297 आणि 594 च्या प्लॅनमध्ये जियोफोन ऑल-इन-वन प्लान सारखे नॉन जिओ मिनिट्सदेखील देण्यात आले नव्हते. अशा परिस्थितीत कंपनीला हे प्लान रद्द करावे लागलेत. त्याचबरोबर कंपनीने 153 रुपयांचा प्लान देखील बंद केला आहे. सध्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये जियोफोनचे चार प्लान असून 75 रुपये, 125 रुपये, 155 आणि 185 रुपयांचे उपलब्ध आहेत. ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या प्लानमध्ये कोणते फायदे दिले जात आहेत हे जाणून घ्या…

JioPhone टॅरिफ प्लान 

जिओने रद्द केलेल्या प्लानमध्ये 99 रुपये, 153 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. 99 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना 0.5 जीबी डाटा देण्यात येत होता. त्याचा कालावधी क्रमश: 28 दिन, 84 दिन आणि 168 दिवस आहे. तिनही प्लान्स अनलिमिटेड जिओ टू जिओ व्हॉईस कॉलिंग आणि नॉन-जिओ कॉलिंग मिनिट्ससह होते. तर जे ग्राहक या प्लानचे रिचार्ज करतात त्यांना देखील FUP च्या प्लानची सुरूवातीची किंमत 10 रुपये आहे. हे तीन प्लान कंपनीच्या वेबसाइटमधील इतर विभागात दिलेले आहेत. तर 153 रूपयांच्या प्लानबद्दल बोलायचे झाले तर दररोज 1.5 जीबी डेटा ग्राहकांना दिला जात होता. याव्यतिरिक्त, अमर्यादित जिओ ते जिओ व्हॉईस कॉलिंग आणि नॉन-जिओ कॉलिंग मिनिटांसह दररोज 100 एसएमएस देखील दिले जात होते. या प्लानचा कालावधी 28 दिवसांचा होता.

- Advertisement -

jio Phone चा 155 रुपयांचा प्लान

जिओच्या 155 रूपयांच्या प्लानमध्ये 1 जीबी डाटा प्रतिदिन उपलब्ध होत होता. तर कंपनीने रद्द केलेल्या 153 रुपयांच्या प्लानमध्ये 1.5 जीबी डाटा प्रतिदिन मिळत होता. तर 155 रूपयांच्या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत या प्लानला रद्द करण्याचा कंपनीचा निर्णय योग्य असल्याचेही म्हटले जात आहे. आता जिओचा बेसिक प्लान 75 रूपये प्रति महिना आहे. तर यापूर्वी तो प्लान 49 रुपये प्रति महिने होता, जो डिसेंबर 2019 मध्येच 75 रूपयांचा करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -