रिवोल्ट कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक बाईक लाँच; केवळ या बाईक २,९९९ रुपयांमध्ये!

रिवोल्ट कंपनीच्या या दोन्ही बाईक तुम्ही केवळ २ हजार ९९९ रुपये प्रति महिना देऊन खरेदी करू शकता.

New Delhi
revolt motors rv400 rv300 electric motorcycles launched in india
रिवोल्ट कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक बाईक लाँच; केवळ या बाईक २९९९ रुपयांमध्ये!

भारतीय बाजारात रिवोल्ट कंपनीने दोन इलेक्ट्रिक बाईक लाँच केल्या आहेत. Revolt RV 400 आणि Revolt RV 300 असं या इलेक्ट्रिक बाईकच नाव आहे. या दोन्ही बाईक कंपनीने एका अनोख्या पेंमेट प्लॅनसोबत भारताच्या बाजारात आणल्या आहेत. या बाईकचे प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैस द्यावे लागणार आहे. Revolt RV 400 बाईक ही केवळ २ हजार ९९९ रुपयांमध्ये तर Revolt RV 300 ही बाईक ३ हजार ४९९ रुपयांमध्ये खरेदी करून शकतात. तसंच बाइकचं टॉप RV 400 मॉडलसाठी फक्त ३ हजार ९९९ रुपये द्यावे लागतील. ३७ महिन्यापर्यंत हे पैस तुम्हाला द्यावे लागतील. ग्राहकाने गाडी खरेदी केलेल्या पहिल्यादिवसापासून ग्राहक हा गाडी मालक असेल, असं रिवोल्ट कंपनीने स्पष्ट केलं आहे.

विशेष म्हणजे या बाईकमध्ये मोबाइल अॅपची सुविधा देण्यात आली आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमची रायडिंग स्टाइल ट्रॅक करू शकता. तसंच बाइकमधील समस्याबाबत माहितीही जाणू शकता. या अॅपमुळे तुमची बाइक ट्रॅक देखील करु शकता. बाइक स्टार्ट करणं या अॅपद्वारे सहज शक्य होऊ शकते.

या बाईकच्या डिलिव्हरीला दिल्लीतून सप्टेंबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे. पुण्यात पुढील महिन्यात ही बाईक लाँच करणार आहे. यानंतर नागपूर, अहमदाबाद, बेंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये लाँच केली जाणार आहे.

RV 400

ही बाईक तुम्ही घरी चार्ज करु शकता. या बाईकला एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १५६ किमीपर्यंत तुम्ही प्रवास करू शकता. बाईक चार्जिंगकेबलच्या मदतीने कोणत्याही सामान्य १५ अँपिअरला प्लग पॉईंटवर चार्ज करता येणं शक्य आहे. 3kW क्षमतेची मोटार आणि 3.24kW लिथियम आयन-बॅटरी या बाईकमध्ये आहे.

RV 300

या बाईकची एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर ८० ते १५० किलोमीटरचा मायलेज मिळेते. 1.5kW क्षमतेची मोटार आणि 2.7kW क्षमतेची बॅटरी या बाईकमध्ये आहे. ६५ किलोमीटर इतका टॉप स्पीड आहे.