चार रिअर कॅमेऱ्यासह Galaxy A31 स्मार्टफोन ४ जूनला लाँच होणार

Mumbai
galaxy a31

दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंग भारतात नवीन मिड रेंज स्मार्ट फोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. कंपनी Galaxy A31 स्मार्टफोन ४ जून रोजी भारतात लाँच करणार आहे. कोराना विषाणूमुळे कंपनी ऑनलाईन स्मार्टफोन लाँच करणार आहे. सॅमसंगने एक टीझर जारी केला आहे. सॅमसंगने या स्मार्टफोनसाठी एक मायक्रो-वेबसाइट देखील तयार केली आहे जिथे सध्या नोटिफाई मी पर्याय उपलब्ध आहे.

या मायक्रो वेबसाइटमध्ये येणार्‍या Galaxy A31 ची काही वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. या स्मार्टफोनमध्ये 48MPचा रीअर कॅमेरा असेल. एकूण चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यातील एक 48MP, दुसरा 8MP, तिसरा 5MP डेप्थ सेन्सर आणि चौथा 5MPचा मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे.


हेही वाचा – सॅमसंगचे दोन नवीन स्मार्टफोन २ जून रोजी भारतात लाँच होणार


Galaxy A31 मध्ये ४.४ इंचाचा फुल एचडी प्लस sAMOLED डिस्प्ले असेल आणि याला एक इन्फिनिटी यू पॅनेल म्हणजे एक छोटा नॉच असेल. या स्मार्टफोनला 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सॅमसंगची ए सीरीज आणि एम सीरीज भारतात बरीच लोकप्रिय आहे.