घरटेक-वेकWhatsApp च्या नव्या अटींमुळे यूजर्सनी घेतला धसका; 'या' मेसेजिंग App ला देतायत...

WhatsApp च्या नव्या अटींमुळे यूजर्सनी घेतला धसका; ‘या’ मेसेजिंग App ला देतायत पसंती

Subscribe

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अटी आणि नियमांमुळे WhatsApp यूजर्सनी धसका घेतला आहे. नव्या अटी जाचक असल्यामुळे WhatsApp यूजर्स नवा पर्याय शोधत आहेत. WhatsApp च्या नव्या अटी आणि नियमांमुळे यूजर्सची प्रायव्हसी धोक्यात येत आहे. त्यामुळे आपल्या प्रायव्हसीला धोका होऊ नये यासाठी आता WhatsApp यूजर्स नवा पर्याय शोधत असून सिग्नल मेसेंजरकडे (signal massenger) जगभरातील लोकांनी मोर्चा वळवला आहे.

गेले दोन दिवस सिग्नल मेसेंजरवर यूजर्सची संख्या वाढल्याने सिग्नल मेसेंजरवर वेरिफिकेशन कोड उशिरा येतो आहे. या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने युजर्सला जोडण्यासाठी एक गाईडलाईन जारी केली असून जी दुसऱ्या मेसेंजर अ‍ॅपवरून सिग्नलवर मूव्ह करण्यासाठी स्टेप्स सांगत आहे. WhatsApp ने बुधवारपासून युजर्सला पॉप-अप मेसेज पाठवायला सुरुवात केली आहे. यात युजर्सला नियम आणि अटींसह नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगण्यात आलं आहे. WhatsApp चे नवे नियम ८ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. नियम आणि अटी मान्य कराव्या लागतील, अन्यथा युजर्सचं अकाउंट डिलीट केलं जाईल, असं WhatsApp ने सांगितलं आहे.

- Advertisement -

सिग्नल मेसेंजर App वापरा; इलॉन मस्क यांचा आवाहन

WhatsApp च्या या घोषणेनंतर वापरकर्ते प्रचंड नाराज आहेत. यूजर्स सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या इतर मेसेंजर Apps कडे मोर्चा वळवला आहे. या संदर्भात टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक इलॉन मस्क यांनी गुरुवारी नवीन वापरकर्त्यांना सिग्नल मेसेंजर App वापरण्यासाठी आवाहन केलं आहे.

सिग्नल वैयक्तिक डेटा विचारत नाही

सिग्नलने डिसेंबर २०२० मध्ये त्याच्या नव्या आवृत्तीसह ग्रुप कॉल लाँच केला आणि त्याला एन्क्रिप्टेड दिलं आहे. सिग्नल पर्सनल डेटा म्हणून केवळ फोन नंबर स्टोअर करतो. तर टेलिग्राम पर्सनल डेटा म्हणून केवळ कॉन्टॅक्ट इंफो, कॉन्टॅक्ट्स आणि युजर ID मागतो. माहिती, संपर्क आणि वापरकर्ता आयडी विचारतो.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -