घरटेक-वेकभारतात 'या' दिवशी लाँच होणार Xiaomi फ्लॅगशिप Mi 10T सीरीज

भारतात ‘या’ दिवशी लाँच होणार Xiaomi फ्लॅगशिप Mi 10T सीरीज

Subscribe

हे स्मार्टफोन 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता भारतात लाँच केले जातील

चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने अलीकडेच Mi 10T आणि Mi 10T Pro ग्लोबल लाँच केले. आता कंपनी या सीरीजला भारतात लाँच करण्याच्या तयारीच आहे. Xiaomi ने जाहीर केले आहे की हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीचे फ्लॅगशिप असून Mi 10T आणि Mi 10T Pro हे 15 ऑक्टोबरला भारतात लाँच होईल.  Mi 10T Pro मध्ये कंपनीने144Hz रिफ्रेश रेट असणारा डिस्प्ले दिला आहे. Mi 10T Pro हा 599 युरो (सुमारे 51,500 रुपये) वर लाँच झाला असून Mi 10T ची किंमत 499 युरो (सुमारे 43,000 रुपये) आहे. हे स्मार्टफोन 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता भारतात लाँच केले जातील. तर हे फ्लिपकार्टवर देखील विकले जाणार असून त्यांची विक्री सेल दरम्यानही सुरू केली जाऊ शकते.

असे आहेत फीचर

Mi 10T आणि Mi 10T Pro च्या भारतीय वेरिएंटमध्ये काय भिन्नता असणार आहे ते सध्या स्पष्ट नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की कंपनी येथे केवळ ग्लोबल वेरिएंट सादर करणार आहे. Mi 10T Pro मध्ये 6.67 इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

- Advertisement -

Mi 10T Pro मध्ये 108 मेगापिक्सलच्या प्रायमरी लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरे आहेत. दुसरा 13 मेगापिक्सलचा आहे, तर तिसरा 5 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्सचा देण्यात आला आहे. कंपनीने या फोनला सेल्फीसाठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Mi 10T Pro मध्ये 5,000mAh बॅटरी आहे आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे. Mi 10T बद्दल सांगायचे झाले तर कॅमेरा कमी मेगापिक्सेलचा असला तरी इतर फीचर समान आहेत.


आज भारतात लाँच होतायत ‘हे’ जबरदस्त फोन, जाणून घ्या फिचर्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -