घरटेक-वेकशाओमीच्या MI 9T ची ट्विटरवर झलक

शाओमीच्या MI 9T ची ट्विटरवर झलक

Subscribe

शाओमीच्या MI 9 सिरीजमधील आणखीन एक फोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

एमआय ९ श्रेणीतील, शाओमी एमआय ९ टी हा नवीन फोन भारतात उपलब्ध होण्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. नुकताच शाओमीने नवीन एमआय फोनचा टीझर समाज माध्यम वाहिनींवर पोस्ट केला. मात्र तरीही या नवीन फोनची वैशिष्ट्य आणि प्रकाशनाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे. चीनमध्ये फेब्रुवारीत लॉन्च झालेल्या एमआय ९, एमआय ९ एसई आणि एमआय ९ ट्रान्सपरेंट एडिशनच्या यादीत लवकरच एमआय ९ टीचा समावेश होईल.

फुल-स्क्रीन वैशिष्ट्यपूर्ण

आज गुरूवारी शाओमीच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर शाओमी एमआय ९ टीची वैशिष्ट्यपूर्ण फुल-स्क्रीनची झलक पाहता आली. विशेष म्हणजे यावेळी फोनचे कोणतेही कटआऊट या ट्वीटमध्ये दिसत नाही. फोनचे छायाचित्र पाहिल्यास फोनच्या स्क्रीनवर केवळ इअरपिस आणि पॉपअप कॅमेऱ्यासाठी जागा देण्यात आल्याचे दिसते. शाओमी ९ टी मधील टी अक्षराच्या अर्थाचा उलगडा मात्र कंपनीकडून अद्याप करण्यात आलेला नाही. कंपनीकडून ट्वीटरवर नेटकऱ्यांना टी अक्षराची अटकळ बांधण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

MI 9 सिरीजमध्ये ठरणार लक्षवेधी

शाओमीच्या एमआय ९ टीचे वैशिष्ट्य असलेल्या फूल स्क्रीन डिस्प्ले आणि पॉप अप कॅमेरा प्रमाणे, शाओमीच्या एमआय ९ फोनमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी पारंपारिक वॉटरड्रॉप शैलीतील डिस्प्ले आढळतो. असेच काही विविध हार्डवेअर बदल शाओमीच्या नवीन फोनमध्ये आढळून येतील. ज्यामुळे शाओमीच्या एमआय ९, एमआय ९ एसई, आणि एमआय ९ या फोनमध्ये शाओमीचा एमआय ९ टी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

NBTC आणि NCC प्रमाणपत्र

आतापर्यंतच्या माहितीनुसार, जरी नुकत्याच प्रदर्शित केलेल्या टीझरमध्ये नवीन एमआय-सीरिज फोनचे डिझाइन हे रेड्मी के२० फोनशी जुळत नसले तरी, या आठवड्याच्या सुरुवातीला चीनमध्ये अनावरण करण्यात आलेल्या रेड्मी के २० आणि रेड्मी के २० प्रो हे दोन्ही फोन, एमआय ९ टी आणि एमआय ९टी प्रो म्हणून काही परदेशी बाजारांमध्ये लॉन्च केले जाऊ शकतात. शाओमी एमआय ९ टी ला नुकताच थायलंडमध्ये एनबीटीसी प्रमाणपत्र तर तैवानमध्ये एनसीसी प्रमाणपत्र मिळाले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -