Xiaomi १ एप्रिलला ५५ मिनीटांत २० प्रोडक्ट करणार लॉंच

Xiaomi चीनचे अध्यक्ष वांग चुआन ५५ मिनीटांत २० प्रोडक्ट्सला लॉंच करणार आहे. या इव्हेंटमध्ये प्रत्येक ३ मिनीटांत एक प्रोडक्ट लॉंच केले जाऊ शकते.

Mumbai

Xiaomiने मागील दोन आठवड्यापासून सतत काही न काही प्रोडक्ट लॉंच करत आहे. नुकतेच या कंपनीने Redmi Note 7, Redmi 7, Mi नोटबुक आणि Mi एयरडॉट्स वायरलेस ईयरबड्सला लॉंच केले आहे. आता कंपनी यापेक्षाही मोठ्या प्रोडक्टच्या तयारीत आहे. १ एप्रिलला रोजी होणारा लॉंचिंग सोहळा सर्वांत मोठा इव्हेंट असणार आहे. कंपनीने चीनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट वीबोवर एक टिझर प्रदर्शित केला आहे.

Xiaomi कंपनी फक्त स्मार्टफोन विकत नाही तर, बरेच प्रोडक्ट्सची विक्री करतात. वीबोवर प्रदर्शित केलेल्या टिझरच्या नुसार २० प्रोडक्ट्स या लॉंचिंग इव्हेंटमध्ये लॉंच केले जाऊ शकातात. चीन मीडियाच्या अहवालानुसार, Xiaomi चीनचे अध्यक्ष वांग चुआन ५५ मिनीटांत २० प्रोडक्ट्सला लॉंच करणार आहे. या इव्हेंटमध्ये प्रत्येक ३ मिनीटांत एक प्रोडक्ट लॉंच केले जाऊ शकते.

प्रदर्शित केलेल्या टिझरमध्ये Xiaomi च्या प्रोडक्ट्समध्ये सनग्लासेस, पॉवर बँक, व्हीआर हेडसेट्स, लॅपटॉप, सूटकेसेस, थर्मामीटर, वॉकी-टॉकी यांचा समावेश असेल. या इव्हेंटमध्ये Mi 9 Roy Wang वर्जन देखील लॉंच केले जाऊ शकते. Xiaomi ने चीनमध्ये अपग्रेडेड प्रोसेसरसह Mi Notebook Pro (2019) 15.6-इंच लॉंच केले आहे. यावेळी Mi Notebook 13.3-इंच वर्जन लॉंच करायचे बाकी असून १ एप्रिलला लॉंच केले जाऊ शकते.