घरठाणेभिवंडीत मजुरांसाठी यंत्रमाग व्यावसायिकांची धडपड

भिवंडीत मजुरांसाठी यंत्रमाग व्यावसायिकांची धडपड

Subscribe

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे करण्यात आलेल्या लोकडाऊनचा फटका शहरातील यंत्रमाग व्यवसायाला चांगलाच बसला आहे. सध्या देशासह राज्यभर अनलॉक करण्यात आला असला तरी लॉकडाउनच्या काळात झालेल्या परप्रांतीय मजुरांच्या स्थलांतरामुळे शहरातील यंत्रमाग व्यवसाय सुरु करण्यासाठी अपुऱ्या मजुरांअभावी यंत्रमाग व्यावसायिकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यातच लॉकडाऊन व अडीच लाख मजुरांच्या स्थलांतरामुळे यंत्रमाग व्यवसाय पुरता डबघाईला गेला आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेल्या या बंदमुळे यंत्रमाग व्यावसायिक प्रचंड आर्थिक कचाट्यात सापडले आहे. शहरात हळूहळू यंत्रमाग व्यवसाय सुरु झाला आहे. मात्र त्यातही मजुरांचा तुटवडा असल्याने मजूर मिळविण्यासाठी यंत्रमाग व्यावसायिकांची धडपड वाढली आहे. लॉकडाऊनमुळे बंद झालेले यंत्रमाग कामगार गावाहून भिवंडीत परंतु लागल्याने यंत्रमागाची धडधड सुरु होत असल्याने कापड मालाची मागणी वाढली आहे. मात्र मजुरांच्या स्थलांतरामुळे सध्या व्यवसायिकांसमोर मजुरांचा मोठा तुटवडा भासत आहे.

अनेक यंत्रमाग व्यावसायिक आपल्या कारखान्यातील स्थलांतरित झालेल्या मजुरांची मनधरणी करत आहेत तर काही व्यावसायिक मजूरांना आगाऊ पैसे व भाड्यासाठी तिकीट बुक करून देत आहेत. मात्र लॉकडाऊन व अनलॉक कालावधीत स्थलांतरित मजुरांनी आपल्या गावी जाऊन शेतीकडे लक्ष दिले असल्याने आजही शहरात मजूर यायला तयार नसल्याने यंत्रमाग व्यवसायिकांसमोर मजूर पुरवठ्याचे नवे आव्हान समोर आले आहे.

- Advertisement -

कापड उद्योगाचे मँचेस्टर त्याच बरोबर कापड उद्योगाचे माहेरघर म्हणून भिवंडी शहर देशभर प्रसिद्ध आहे. कापडाची निर्मिती व व्यापार मोठ्या प्रमाणत असल्याने भिवंडीत यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला होता. एकेकाळी देश विदेशातील मोठ मोठ्या बाजारपेठांवर अधिराज्य गाजविलेला भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय मात्र लॉकडाऊनमुळे पुरता डबघाईला आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अनलॉक काळात यंत्रमाग व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे मात्र यंत्रमाग मजूर परप्रांतातील आपल्या मुळगावी गेल्याने सध्या मजुरांअभावी येथील यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. एकीकडे अनेक दिवसांपासून बंद असलेला यंत्रमाग व्यवसाय सुरु झाल्याने व्यावसायिकांकडे मालाची मागणी वाढली आहे मात्र मजूरपुरवठा कमी असल्याने जादा उत्पादनात अडचणी येत आहेत.

सध्या शहरात ७० ते ८० टक्के यंत्रमाग व्यवसाय दोन शिफ्ट मध्ये सुरु झाला आहे मात्र दहा बारा दिवसांपूर्वी मजुरांचा अभाव शहरात जास्त होता आता हळूहळू गावी गेलेलले मजूर परतत असल्याने सध्या यंत्रमाग व्यवसाय पूर्वपदावर येत आहे मात्र पूर्वीप्रमाणे यंत्रमाग व्यवसाय सुरु व्हायला अजून किमान बारा ते पंधरा दिवसांचा कालावधी जाईल, अशी प्रतिक्रिया भिवंडीतील यंत्रमाग व्यावसायिक यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

कांदा महागला; केंद्र सरकारने आणली सर्व प्रकारच्या निर्यातीवर बंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -