Video : …यामुळे ‘हा’ हॅशटॅग टॉप ट्रेंडिंग; ‘रेड लेबल’ ट्रोल

'ब्रूक बॉण्ड रेड लेबल टी' या ब्रँडच्या प्रदर्शित झालेल्या गणेश चतुर्थीशी संबंधित जाहिरातीला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

Mumbai
boycottredlebel an old advertise of brooke bond red label tea related to ganesh chaturthi was trolled on social media
'रेड लेबल' ट्रोल

गेल्या वर्षी ‘ब्रूक बॉण्ड रेड लेबल टी’ या ब्रँडच्या प्रदर्शित झालेल्या गणेश चतुर्थीशी संबंधित जाहिरातीला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. ही जाहिरात हिंदू विरोधी असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणे आहे. तसेच या जाहिरातीतून हिंदू – मुस्लिम ऐक्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. याच कारणामुळे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेली जाहिरात ट्विटरवर #BoycottRedLebel हा हॅशटॅग टॉप ट्रंडिंगमध्ये आहे.

काय आहे या जाहिरातीत

एक तरुण गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी एका दुकानात जातो. दरम्यान, त्या ग्राहकाला एक मूर्ती आवडते. तो ही मूर्ती…असं म्हणत थांबतो. कारण जेव्हा तेव्हा मागेवळून पाहतो. त्यावेळी गणपती विक्रेते डोक्यावर टोपी घालत असतात. त्यावेळी त्या ग्राहकाला मूर्ती विक्रेते मुसलमान असल्याचे कळते आणि तो ग्राहक गणपती खरेदी करण्यास टाळाटाळ करतो. मात्र, त्याआधी विक्रेत्यांनी चहाची ऑर्डर दिलेली असते. ते ग्राहकांना ‘ओ भाईजान चाय पिके तो जाओ’,असे म्हणत त्यांना थांबवतो. चहा पिताना मूर्तीकार म्हणतो, ‘नमाज पठण करणारे हात जर बाप्पाची मूर्ती सजवणार असतील तर आश्चर्य वाटणारच…’त्यावर तुम्ही हेच काम करता का, असे ग्राहक विचारतो. त्यावर ‘ही एक प्रकारची ईश्वरसेवा’, असल्याचे मूर्तीकार ग्राहकाला सांगतो. त्यानंतर प्रभावित होत तो हिंदू ग्राहक मुसलमान मूर्तीकाराकडून मूर्ती विकत घेतो.


हेही वाचा – ‘साहो’ चित्रपटावरील ‘हे’ धमाल मीम्स पाहून तुम्हाला हसू होईल अनावर