वर्षभरापासून फ्रिजमध्ये ठेवलेले नूडल्स खाऊन ९ जणांचा मृत्यू

आपल्याला अनेक वेळा फ्रिजमध्ये जास्त वेळ जेवण ठेवू नका किंवा फ्रिजमधले जेवण पुन्हा गरम करून खा अशा अनेक सूचना दिल्या जातात. पण अशा सूचनेकडे कानाडोळा केल्यामुळे एकाच कुटुंबातील ९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. फूड पॉयजनिंग झाल्यामुळे एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना चीनमध्ये घडली आहे.

फ्रिजमध्ये जवळपास एक वर्ष नूडल्स ठेवले होते. जे खाऊ या लोकांचा मृत्यू झाला. या कुटुंबातील लोकांनी फ्रिजमध्ये ठेवलेल्या नूडल्सचे सूप तयार केले होते. डेली मेलच्या वृत्तानुसार, नूडल्स खाल्ल्यानंतर काही तासांत हे लोक आजारी पडले. दरम्यान या ब्रेकफास्टच्यावेळी एकूण १२ लोक उपस्थित होते.

माहितीनुसार, ही घटना ५ ऑक्टोबर घटली. त्यानंतर १० ऑक्टोबरला  सात जणांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली. तर आठव्या व्यक्तिचा  दोन दिवसांनंतर झाला आणि नवव्या व्यक्तिचा मृत्यु सोमवारी झाला.

हे पिडीत कुटुंब उत्तर चीनच्या हेलोंगजिआंगमध्ये राहते. या घटनेनंतर चीनच्या हेल्थ कमिशनने राष्ट्रीय इशारा दिला आहे की, लोकांनी आंबलेल्या पिठापासून बनविलेले जेवण खाऊ नये.

दरम्यान नूडल्स खाल्ल्यानंतर आजारी पडलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. असे म्हटले जाते की, त्या दिवशी नूडल्सच्या वेगळ्या चवीमुळे तीन जणांनी नूडल्स खाण्यास नकार दिला होता.