घरट्रेंडिंगचक्क कासवासाठी त्यांनी बनवली व्हीलचेअर!

चक्क कासवासाठी त्यांनी बनवली व्हीलचेअर!

Subscribe

मागचे दोन पाय नसल्यामुळे अपंग झालेल्या एका कासवासाठी कॅलिफोर्नियामधल्या डॉक्टरांनी एक 'मिनी' व्हीलचेअर बनवली आहे. त्यामुळे हे कासव पुन्हा चालू लागले आहे!

अमेरिकेमध्ये एका कासवाने पाय गमावल्यामुळे डॉक्टरांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी व्हीलचेअर तयार केली.
एका १५ वर्षीय कासवाने मागील पाय काही कारणामुळे गमावले होते. त्यामुळे त्या कासवाला कोणतीही हालचाल करता येत नव्हती. पण कासवाच्या मालकाने त्याला एलएलयू स्कूल ऑफ वेटनिटी मेडिसीनच्या वेटरनिटी टीचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या कासवामध्ये दोन्ही पाय सोडून काहीच दोष नसल्याचे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

…आणि कासव धावू लागलं!

त्या १५ वर्षीय कासवाचे नाव पेड्रो असे आहे. या पेड्रोसाठी एलएलयू स्कूल ऑफ वेटनिटी मेडिसीनच्या वेटरनिटी टीचिंग हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आणि विद्यार्थ्यांनी स्पेशल व्हीलचेअर तयार केली. त्या कासवाला व्हीलचेअर लावल्यानंतर ते धावू लागलं. पेड्रोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डॉ. मार्क मिशेल, केली रॉकवेल, एलएसयू वेटरनिटीची विद्यार्थिनी एस. सी. मर्सर आणि इतर विद्यार्थी एकत्र आले आणि या सर्वांनी पेड्रोसाठी व्हीलचेअर तयार केली. सोशल मीडियावर मालकाचे, डॉक्टरांचे आणि इतर विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.

याबाबत बोलताना केली रॉकवेल म्हणाल्या की, ‘आम्ही एका सळईच्या दोन्ही बाजूला चाकं लावली. त्याचा आकार पेड्रोच्या शरीराला योग्य ठरेल असा ठेवण्यात आला. घोड्याची नाळ बसवण्यासाठी जे एपोक्सी लावलं जातं, त्याचा वापर आम्ही पेड्रोच्या शरीरावर व्हीलचेअर बसवण्यासाठी केला. तसेच इतर गोष्टींचा देखील वापर केला.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -