घरUncategorizedखोकल्याच्या औषधामुळे नऊ निष्पाप बालकांचा मृत्यू

खोकल्याच्या औषधामुळे नऊ निष्पाप बालकांचा मृत्यू

Subscribe

उधमपूरमध्ये हे विषारी औषध पिल्याने ९ मुलांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण आजारी पडले आहेत.

काही वेळेस औषधांची कालबाह्यता संपूनही औषधांची विक्री केली जाते आणि यामुळे विषारी औषधांच्या विक्री केल्याने निष्पाप जीव जातात. उधमपूरमधील असाच एक प्रकार समोर आला आहे. उधमपूरमध्ये विषारी औषध पिल्याने ९ बालकांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण आजारी पडले आहेत. जम्मू-काश्मीरमधील आरोग्य विभागाच्या पुढाकारानंतर आठ राज्यांमधून खोकल्याच्या विषारी औषधाच्या पाच हजार बॉटल्स परत मागवण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या घातक औषधांचा पुरवठा देशभरातील आठ राज्यांमध्ये झाल्याचे समजल्यावर आरोग्य विभागाला जाग आली आहे. यानंतर तातडीने या औषधाचा पुरवठा बंद केला आहे. तसेच सर्व राज्यांमधून हे घातक औषध परत मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घातक औषधाचे नाव ‘कोल्डबेस्ट-पीसी’ आहे, याच औषधामुळे मागील महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये मुलांचा मृत्यू झाला होता.

औषधाचा पुरवठा हिमाचल प्रदेशसह अन्य सात राज्यांमध्ये 

या औषधामध्ये विषारी घटकांचा समावेश असल्याचे तपासणी दरम्यान समोर आले आहे. हिमाचल प्रदेशमधील मौजूद डिजिटल व्हिजन फार्मास्यूटिकलने हे औषध तयार केले होते. या कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला असून ज्या राज्यांमधून हे औषध परत मागवण्यात आले होते त्यात हिमाचल प्रदेशसह जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, मेघालय आणि तमिळनाडू यांचा समावेश आहे. या औषधामध्ये विषारी घटकांचा समावेश होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे हे औषध घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील नऊ मुलांचा मृत्यू झाला. या ‘कोल्डबेस्ट-पीसी’ औषधात विषारी ‘डायइथिलीन ग्लायकोल’ चा समावेश होता. ही माहिती जम्मू-काश्मीरमधील ड्रग अँड फूड कंट्रोल ऑर्गनायझेशनचे सहाय्यक ड्रग्स नियंत्रक सुरिंदर मोहन यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उंची वाढवायची आहे? नो टेंशन, हे घरगुती उपाय एकदा करून बघा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -