घरमुंबईछाननीनंतर मुंबई उपनगर जिल्ह्यातील २७२ उमेदवारांचे अर्ज वैध

छाननीनंतर मुंबई उपनगर जिल्ह्यातील २७२ उमेदवारांचे अर्ज वैध

Subscribe

‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९’ या अनुषंगाने २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणारा ‘मुंबई उपनगर जिल्हा’ हा मतदारसंघ, मतदान केंद्र, मतदार संख्या आणि भौगोलिक क्षेत्र इत्यादी बाबींचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे सादर करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची निवडणूक आयोगाकडून आज छाननी करण्यात आली. या छाननीनंतर मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकूण २७२ उमेदवारांची नामनिर्देश पत्रे निवडणूक आयोगाकडून ग्राह्य धरण्यात आली आहेत. या उमेदवारांना येत्या सोमवारी म्हणजेच ७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांमध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर आज छाननी करण्यात आली. छाननीनंतर ग्राह्य धरण्यात आलेल्या अर्जांबाबतचा संक्षिप्त तपशिल खालीलप्रमाणे आहे:

- Advertisement -

152- बोरीवली विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 5

153-दहिसर विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 10

- Advertisement -

154-मागाठाणे विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 11

155-मुलुंड विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 14

156- विक्रोळी विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 9

157-भांडूप (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 7

158- जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 7

159-दिंडोशी विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 11

160- कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 6

161-चारकोप विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 7

162- मालाड (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 11

163- गोरेगाव विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 9

164-वर्सोवा विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 11

165-अंधेरी (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 10

166- अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 8

167- विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 9

168-चांदिवली विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 17

169-घाटकोपर (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 16

170-घाटकोपर (पूर्व) विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 11

171-मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 15

172- अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 20

173- चेंबुर विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 12

174- कुर्ला विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 7

175-कलिना विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 14

176- वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवार :- 15

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -