घरमहाराष्ट्रपुन्हा एकदा रिमझिम पावसात पवारांची सभा; कर्जत-जामखेडमध्ये जोरदार बॅटिंग

पुन्हा एकदा रिमझिम पावसात पवारांची सभा; कर्जत-जामखेडमध्ये जोरदार बॅटिंग

Subscribe

महाराष्ट्रात सध्या कर्जत-जामखेड याच मतदारसंघाची चर्चा आहे. भाजपच्या नेतेमंडळीची झोप इथल्या तरुणांनी उडवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकदा नाही तर तीनदा कर्जत जामखेडमध्ये येऊन गेले, अशी टीका शरद पवार यांनी केली. काल सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सभा घेत असताना धो-धो पावसातही पवार यांनी जोरदार भाषण केले. आजही ते आपले नातू रोहित पवार यांच्यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघात सभा घेत आहेत. यावेळी येथे देखील रिमझिम पाऊस पडत आहे.

“आज रोहित ज्या वयाचा आहे, ५२ वर्षांपूर्वी मी देखील याच वयात आमदारकीला उभा होतो. मात्र तेव्हाची बारामती आताच्या बारामती सारखी नव्हती. दुष्काळ होता, कारखानदारी नव्हती, शाळा-महाविद्यालयाची तितकीशी सोय नव्हती. मात्र बारामतीकरांनी मला संधी दिली आणि आज बारामतीचा चेहरा-मोहरा बदलला. आज रोहितने कर्जत-जामखेडची जबाबदारी घेतली आहे. भविष्यात या मतदारसंघाचाही चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात देशाचा प्रधानमंत्री कर्जत-जामखेडचा विकास पाहायला येणार”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

- Advertisement -

घरी गेल्यानंतर पहिले कपडे बदला, भिजलेल्या कपड्यांमुळे आजारी पडाल. कपडे बदलल्यानंतर घरोघरी जावा. उमेदवाराचे नाव, चिन्ह लोकांना समजून सांगा. सोमवारी सकाळी लवकर उठून तुमचे मत आधी द्या. मग इतर गावातील लोक घड्याळाला मत देतील, याचा प्रयत्न करा असे आवाहनही पवार यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -