घरमहाराष्ट्रआज राज ठाकरे यांच्या भाषणात 'हे' मुद्दे असण्याची शक्यता

आज राज ठाकरे यांच्या भाषणात ‘हे’ मुद्दे असण्याची शक्यता

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातून प्रचाराचे नाराळ फोडणार आहेत. आज संध्याकाळी सहा वाजता पुण्याच्या शुक्रवार पेठ येथील सरस्वती शाळेच्या मैदानात त्यांची सभा होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत राज्य सरकारच्या कामाचा चांगलाच समाचार घेतला होता. आता देखील राज ठाकरे भाजप सरकारच्या कामांचे वाभाडे काढतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण असताना ईडीने कोहीनूर मील प्रकरणी राज ठाकरे यांना अचानक समन्स बजावले. राज ठाकरे ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. त्यानंतर राज ठाकरे याविषयावर काहीच बोलले नाही. आपण योग्य वेळी सविस्तर बोलू असे राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आज नेमके काय बोलतील? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या प्राचारासाठी राज ठाकरे यांना सभा घेण्यासाठी मैदान मिळत नव्हती. मात्र अखेर पुण्यात सरस्वती शाळेचे मैदान मिळाले आहे. आज संध्याकाळी ही सभा असणार आहे. दरम्यान, पुण्यात पावसाचे सावट आहे. आज दुपारी येथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय मैदानातही चिखल साचल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कसबा गणपतीचे दर्शन घेऊन संध्याकाळी सात ते साडे सातच्या दरम्यात पुण्यात भाषण करतील, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा – हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे – एकनाथ खडसे

राज ठाकरे ‘या’ मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता

  • मंगळवारी पंकजा मुंडे यांनी बीडच्या सावरगाव येथील भगवान गडावर दसारा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. भाजपने आता काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्याच्या मुद्द्यालाच प्रचाराचा अजेंडा बनवल्याचे दिसत आहे. त्यामुळे याच मुद्द्याला घेऊन राज ठाकरे काय बलोतली? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
  • ईडी चौकशीनंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे ईडी चौकशीवरुन राज ठाकरे नेमके काय बोलतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
  • कोथरुड मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील उमेदवारी लढवत आहेत. याशिवाय आज लडाखचे तडफदार खासदार जामयांग शेरिंग पुण्यात येणार आहेत. त्यामुळे राज यांच्या रडारवर चंद्राकांत पाटील देखील असण्याची शक्यता आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -