घरमहाराष्ट्रनाशिकटास्क फोर्स रोखणार शेतकरी आत्महत्या

टास्क फोर्स रोखणार शेतकरी आत्महत्या

Subscribe

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा सहभाग, विद्यापीठातील तज्ञांचीही मदत घेणार

जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी टास्क फोर्स स्थापन केला आहे. यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा सहभाग असून याप्रश्नी विद्यापीठातील तज्ञांचीही मदत घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर आहे. यवतमाळ येथे असताना शेतकरी आत्महत्येचे लोणच पसरले होते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणे आवश्यक आहे, याच विचारातून टास्क फोर्सची संकल्पना पुढे आली. नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गतवर्षी १०४ शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. यंदा जानेवारी ते जून या काळात सुमारे ४२ शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यावर उपायासाठी पुढाकार घेत जिल्हाधिकार्‍यांनी विविध यंत्रणांना एकत्र करीत, उपाययोजनांसाठी टास्क फोर्सचे प्रयत्न चालवले आहेत. बहुतांश शेतकरी आत्महत्या या आर्थिक विवंचेतून घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. याकरता विविध योजनांचे एकत्रिकरण करून त्याबाबत ग्रामीण भागात शिबिरे घेऊन या योजनांचा लाभ जर शेतकर्‍यांना मिळवून दिला, तर शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असा एक विचार पुढे आला आहे. त्यामुळे या टास्क फोर्सच्या माध्यमातून गावागावात जनजागृती करण्याबरोबरच शेतकर्‍यांचे प्रश्न जाणून घेण्यात येतील आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात येतील, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक, विद्यापीठाचे कुलगुरू, समाज अभ्यासक, अग्रणी बँकेसह विविध बॅकांचे पदाधिकारी अशा सगळ्यांना एकत्र आणून हा टास्क फोर्स काम करणार असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणाचा उद्देश

शेतकरी आत्महत्येचे मूळ आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक प्रश्न सोडवून त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा टास्क फोर्सचा प्रमुख उद्देश राहील. त्यात सावकारीचा फास सोडवण्यापासून, तर त्याचे उत्पन्न वाढवण्याच्या उपाययोजना आखण्यापर्यंत प्रयत्न केले जातील. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -