घरदेश-विदेशमुलासोबत रात्र घालवल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

मुलासोबत रात्र घालवल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Subscribe

म्हैसूर येथे नववीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. म्हैसूर पोलिसांनी (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

कर्नाटकमधील म्हैसूर येथील नववीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या मुलीचा मृतदेह हॉस्टेलमधील एका रूममध्ये छताला असलेल्या पंख्याला लटकलेला आढळला. त्यावेळी ही बाब समोर आली. हॉस्टेल प्रशासनाने तातडीने पोलिसांना बोलावून घेतले. ही घटना रविवार, २४ जून रोजी उघडकीस आली. या घटनेबाबत अधिक तपास म्हैसूर पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्या विद्यार्थीनीने आपल्या प्रियकरासोबत एकत्र रात्र घालवल्यामुळे तिच्यावर चहू बाजूंनी टीका झाली. त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

काय आहे घटना

नववीतील ही विद्यार्थीनी तिच्या शाळेतील इतर मुलींसोबत म्हैसूरला पिकनीककरता गेली होती. पिकनीकवरून परतल्यानंतर मुलासोबत राहिल्यामुळे तिच्यावर टीका होऊ लागली. त्या १५ वर्षीय मुलीला पश्चाताप झाल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. म्हैसूर पोलिसांनी Protection of Children from Sexual Offences Act (POCSO) कायद्याअंतर्गत त्या विद्यार्थीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय हॉस्टेलच्या शाळेच्या अधिकार्याद्वारे तिच्या निष्काळजीपणासाठी वॉर्डन निलंबित केले गेले आहे.

पोस्को म्हणजे नक्की काय

  • प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल अॅक्ट
  • लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण असे याला मराठीत म्हणतात
  • २०१२ साली हा कायदा अस्तित्वात आला
  • या कायदामध्ये ४६ कलमांचा समावेश आहे
  • कायद्यातंर्गत ३ वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -