घरट्रेंडिंगViral Check: डोंगरी इमारत दुर्घटनेचा व्हायरल होणारा तो व्हिडिओ फेक

Viral Check: डोंगरी इमारत दुर्घटनेचा व्हायरल होणारा तो व्हिडिओ फेक

Subscribe

मुंबईत आज पुन्हा एकदा धोकादायक असलेली इमारत कोसळली. डोंगरी परिसरातील बाबा गल्ली येथील केसरबाई नावाची चार मजल्यांची इमारत दुपारच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी आहेत. अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे बचाव कार्य अजूनही सुरु आहे. या घटनेला काही तास झाल्यानंतर इमारत पडल्याचा एक लाईव्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र व्हायरल होणारा हा व्हिडिओ फेक असल्याचे समोर आले आहे.

fake video of kesarbai building collapse
डोंगरीच्या नावाने व्हायरल होणारा फेक व्हि़डिओ

इमारत पडतानाचा एक फेक व्हिडिओ सध्या डोंगरीचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओवर टेक्स्टमध्ये बाबा गल्ली असे लिहले असून त्यावर आजची तारिखही टाकण्यात आली आहे. इमारत आणि आजुबाजूच्या परिसराचे डोंगरीशी साम्य वाटत आहे. त्यामुळे हा फेक व्हिडिओ बिनधास्तपणे व्हायरल केला जात आहे. मात्र मायमहागनरच्या टीमने या व्हिडिओची सत्यता पडताळली असता हा व्हिडिओ जुनाच असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

इंडिया टॉप व्हायरल व्हिडिओ या युट्यूब चॅनेलवर ९ सप्टेंबर २०१७ रोजी हाच व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. चॅनेलचे नावच व्हायरल व्हिडिओ असल्याकारणाने २०१७ च्याही आधीचा हा व्हिडिओ असण्याची शक्यता आहे.

 

- Advertisement -

डोंगरीतील परिस्थिती पाहा

आता आम्ही तुम्हाला डोंगरी परिसरातील खरी परिस्थिती दाखवत आहोत. अतिशय चिंचोळ्या भागात केसरबाई इमारत होती. बचाव कार्य करत असताना अतिशय उंचावरून हा व्हिडिओ घेण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही फेक व्हिडिओशी त्याची तुलना करू शकता. केसरबाई इमारतीच्या आजुबाजुला कुठेही निळ्या पत्राचे घर तुम्हाला दिसणार नाही. डोंगरीतील इमारतीच्या आजुबाजुला असलेल्या घरांवर सिमेंटचे पत्रे असून त्यावर निळी ताडपत्री टाकलेली दिसते.

 

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -