घरमुंबईरेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; सर्व प्रवासी सुखरुप बाहेर

रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; सर्व प्रवासी सुखरुप बाहेर

Subscribe

मुसळधार पावसामुळे वांगणी येथे शुक्रवार रात्रीपासून खोळंबलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले आहे. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आज सकाळपासून रेसक्यू ऑपरेशन सुरु होते.

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून रेसक्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले होते. आज सकाळपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील या ऑपरेशनकडे बारकाईने लक्ष्य होते. त्यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोकय मेहता यांना ऑपरेशनकडे गांभिर्याने आणि वैयक्तिकपणे लक्ष्य केंद्रित करण्याचे आदेश दिले होते. पावसाचा प्रचंड जोर आणि अडकलेले प्रवासी याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा काळजाचा ठोका चुकला होता. अखेर रेसक्यू ऑपरेशनमार्फत सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

बचाव कार्यासाठी नौदलाचे ७ पथक केले होते दाखल

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी नौदलाचे ७ पथक तर हवाई दलाचे २ हेलिकॉप्टर रवाना झाल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती. सैन्य दलाचे दोन पथक आणि स्थानिक सव्यंसेवकांच्या मदतीने रेल्वेत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, पावसाने पुन्हा जोर पकडल्यामुळे बचाव कार्यापुढे आव्हान वाढले. आज सकाळी एनडीआरएफचे दोन पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याशिवाय हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर बचावासाठी वांगणीच्या दिशेला रवाना झाले होते.

- Advertisement -

‘रेस्कूय ऑपरेशनकडे वैयक्तिकपणे लक्ष्य केंद्रित करा’; मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना निर्देश

वांगणी येथे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना रेसक्यू ऑपरेशनमार्फत लवकरात लवकर बाहेर काढण्यात यावे आणि या रेसक्यू ऑपरेशनकडे वैयक्तीकपणे लक्ष्य देण्याचे निर्देश मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना दिले. शुक्रवार सकाळपासून मुंबई, उपनगर आणि ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे कल्याण येथील उल्हास नदीला पूर आला असून शुक्रवारी रात्री मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस वांगणी येथे खोळंबली. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने ही एक्सप्रेस गाडी पुढे जाऊ शकली नाही. त्यानंतर रात्रभर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पूरसद्रुश परिस्थिती निर्माण झाली. अखेर शनिवारी सकाळी प्रशासनाला जाग आली. मात्र, दहा ते बारा तास गाडी एकाच ठिकाणी खोळंबली. शनिवारी सकाळी एनडीआरफीची टीम, उल्हासनगर महापालिका कर्मचारी यांनी बचावकार्याला सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.

- Advertisement -

सकाळीच हवाई दलाचे हेलिकॉप्टर प्रवाशांच्या मदतीसाठी वांगणीकडे रवाना

शनिवारी सकाळी प्रशासनाला महालक्ष्मी एक्सप्रेस गाडी अडकल्याची जाग आली. त्यामुळे सकाळी हवाई दलाचे हेलिकॉप्टर प्रवाशांच्या बचावासाठी वांगणीकडे रवाना झाले. त्यानंतर एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बोटच्या मदतीने प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. यावेळी अॅम्बूलन्स देखील घटनास्थळी दाखल करण्यात आल्या. घटनास्थळी एनडीआरएफचे ४ पथक दाखल झाले. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले. गाडीत अडकलेल्यांना चहा आणि बिस्कीटे देण्यात आली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -