घरदेश-विदेशजगातील महागड्या कॉर्पोरेट हबमध्ये 'बिकेसी, नरिमन पॉईंट'चा समावेश!

जगातील महागड्या कॉर्पोरेट हबमध्ये ‘बिकेसी, नरिमन पॉईंट’चा समावेश!

Subscribe

जगभरातील महागड्या व्यापारी संकुलांमध्ये मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बिकेसी) आणि नरिमन पॉईंट या दोन भागांचा समावेश असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.

जगभरातील महागड्या व्यापारी संकुलांमध्ये मुंबईतील दोन भागांचा समावेश असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. तर दिल्लीमधील देखील ‘कॅनॉट प्लेस’ चा समावेश जगभरातील पहिल्या दहा महागड्या व्यापारी संकुलांमध्ये करण्यात आला आहे. तर मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बिकेसी) आणि नरिमन पॉईंट हे अनुक्रमे २९ आणि ४० व्या क्रमांकावर आहेत. तर हाँगकाँग सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकावर आहे.

भारतातील सीबीआरई या रियल इस्टेट क्षेत्रातील आघाडीच्या कन्सल्टिंग फर्मने ‘ग्लोबल प्राईम ऑफिस ऑक्युपेन्सी कॉस्ट सर्वे’हा आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. या सर्वेनुसार ही माहिती समोर आली आहे. या अहवालात जगभरातील कार्यालयांच्या जागांच्या किमती नमूद केलेल्या आहेत. त्यानुसार नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस सीबीडी या व्यापारी संकुलाचे स्थान नववे आहे. येथील ‘ऑक्युपेन्सी कॉस्ट’ १४३.९७ डॉलर प्रति चौरस फूट अशी गणली गेली आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि नरिमन पॉईंट सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट यांचा समावेश या यादीत २७ व्या आणि ४० व्या स्थानांवर अनुक्रमे आहेत. बीकेसीची ‘ऑक्युपन्सी कॉस्ट’ ९०.६७ डॉलर प्रति चौरस फूट आणि नरिमन पॉईंटची ‘ऑक्युपन्सी कॉस्ट’ ६८.३८ डॉलर प्रति चौरस फूट अशी नमूद करण्यात आली आहे. तर हाँगकाँगच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टने यामध्ये अव्वल स्थान सलग दुसऱ्या वर्षीही राखले आहे. भाडेतत्त्वावरील आलिशान कार्यालयांसाठी येथील किंमत ३२२ डॉलर प्रति चौरस फूट इतकी आहे.

- Advertisement -

दरम्यान, भारतातील प्रमुख शहरांमध्ये असलेल्या व्यापारी संकुलांची गणना ही देशी आणि जागतिक कंपन्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरत आहे. या शहरांमध्ये व्यावसायिक कार्यालय (फ्रंट ऑफिस) सुरू करण्यासाठी या व्यापारी संकुलांची निवड या कंपन्या मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. व्यावसायिक कार्यालयीन बाजारपेठांचे महत्व आणि त्याची वाढ रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या जोमाने होऊ लागली असल्याचे ‘सीबीआरई’च्या भारत, दक्षिण-पूर्व आशिया, मध्य-पूर्व आणि आफ्रिका या विभागांचे प्रमुख आणि सीईओ अंशुमन मॅगझीन यांनी सांगितले.

हेही वाचा – 

आझम खान यांनी अखेर रमादेवींबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर माफी मागितली

- Advertisement -

मुंबईचे अध्यक्षपद रिकामे ठेवण्यात जयंत पाटील यांचा स्वार्थ काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -