घरमहाराष्ट्रनाशिकअधिसभा निवडणुकीचा बिगूल वाजला

अधिसभा निवडणुकीचा बिगूल वाजला

Subscribe

सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे महाविद्यालयांचा कार्यक्रम जाहीर; 7 सप्टेंबरला मतदान

विद्यार्थी संघटना व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागून असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. पुणे विद्यापीठाने महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागातील विद्यार्थी परिषद निवडणुकीची आचारसंहिता 20 ऑगस्टपासून लागू होणार आहे; तर विविध पदांसाठी 30 ऑगस्टला मतदान होणार आहे.

विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठी विभाग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालय विद्यार्थी परिषदेसाठी वर्गप्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांसाठी निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी प्राचार्य, संचालक यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सोईनुसार चार तासांची मतदानाची वेळ जाहीर करावी, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. निकालानंतर महाविद्यालयांना पदाधिकार्‍यांची माहिती विद्यापीठाकडे सादर करावी लागणार आहे.

- Advertisement -

विद्यार्थी संघटनांमध्ये उत्साह

महाविद्यालयांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच विद्यार्थी संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे. प्राचार्यांना विश्वासात घेऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले. मात्र, अनेक वर्षांपासून प्रतिक्षा लागून असलेल्या निवडणुका घोषित झाल्याने आता महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते.

निवडणूक वेळापत्रक

  • 23 ऑगस्ट: मागास प्रवर्ग प्रतिनिधींच्या आरक्षणासाठी सोडत.
  • 29 ऑगस्ट: अर्ज दाखल करण्याची तारीख अंतिम तारीख.
  • 31 ऑगस्ट: नामनिर्देशन अर्जांची छाननी.
  • 5 सप्टेंबर: उमेदवारांची अंतिम यादी.
  • 7 सप्टेंबर: मतदान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.
  • 7 सप्टेंबर: दुपारी 4 वाजता निकाल.
  • 9 ते 21 सप्टेंबर: प्रत्येक उमेदवाराचा खर्च सादर करणे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -