घरमहा @२८८मुरबाड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३९

मुरबाड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३९

Subscribe

भिवंडी हा लोकसभा मतदारसंघ असून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड (विधानसभा क्र. १३९) विधानसभा मतदारसंघ आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हा क्रमांक १३९ चा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण मतदान केंद्र आहेत. मुरबाड तालुक्यातील गोटीराम पवारांना मानणारा मोठा वर्ग असून तो आता शिवसेनेच्या मागे आल्याने शिवसेनेची ताकद मजबूत झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुरबाड तालुक्यातील खिंडार पडले असून, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते सुभाष पवार यांची हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मतदारसंघ क्रमांक – १३९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,८९,९४०
महिला – १,६६,०९१
एकूण मतदार – ३,५,६०३८

- Advertisement -

विद्यमान आमदार – किसन कथोरे

किसन कथोरे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ८५, ५४३ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गोटीराम यांचा २६ हजार २३० मतांनी पराभव केला होता.

भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून शेतकी संस्था स्थापन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उल्हासनगरच्या न्यायालयाने दिले होते. धक्कादायक बाब म्हणजे सनदी अधिकारी  आर ए राजीव आणि काही मृत व्यक्तींच्या नावाचाही यात समावेश आहे. अंबरनाथ तालुक्यातील ‘सागाव परिसर विविध कार्यकारी सेवा संस्था’ ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांच्या अधीन राहून नोंदणीकृत करण्यात आली होती. मात्र यात  नाव आल्याने शिवसेनेचे प्रभु पाटील यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून या माहिती मिळवली. यात त्यांच्या नावासह इतर काही व्यक्तींच्या नावांचा त्यात समावेश असल्याची  माहिती उघडकीस आली. विशेष बाब म्हणजे यातील काही व्यक्तींचा मृत्यूही झाला होता. तर सनदी अधिकारी आर ए राजीव यांच्या नावाचाही यात समावेश होता. यात आमदार किसन कथोरे मुख्य प्रवर्तक असल्याची माहिती समोर आली आहे.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • किसन कथोरे, भाजप – ८५, ५४३
  • गोटीराम पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – ५९, ३१३
  • वामन म्हात्रे, शिवसेना – ५३, ४९६
  • आशिष दामले, अपक्ष – ९, ७०५
  • राजेश घोलप, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – ३, ४०१

नोटा – ३३९३

मतदानाची टक्केवारी – ६३.३३


हेही वाचा – ठाणे लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -