घरमहाराष्ट्रनिवडणूक न लढविणाऱ्यांनी EVM वर बोलू नये; शेलारांचा राज ठाकरेंना चिमटा

निवडणूक न लढविणाऱ्यांनी EVM वर बोलू नये; शेलारांचा राज ठाकरेंना चिमटा

Subscribe

ईव्हीएमला विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन सर्व विरोधी पक्षनेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “ईव्हीएम बंदीची ज्यांनी मागणी केली, त्यांनी आयुष्यात कधीच निवडणूक लढवलेली नाही.” असा चिमटा शेलार यांनी राज ठाकरे यांचे नाव न काढता काढला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेलार यांनी हा आरोप केला आहे.

विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले की, “या पत्रकार परिषदेला उपस्थित असणाऱ्यांपैकी बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि अजित पवार हे ईव्हीएम मशीनद्वारेच निवडून आले आहेत. त्यामुळे विरोध करण्याआधी पहिल्यांदा त्यांनी राजीनामा द्यावेत. तसेच ज्यांनी कधी निवडणूक लढवलीच नाही, ते विरोध करत आहेत. नाचता येईना, अंगण वाकडे अशा पद्धतीचे राजकारण विरोधक करत” असल्याचा टोला शेलार यांनी लगावला. राज ठाकरे यांच्या पुढाकाराबाबत बोलताना शेलार म्हणाले की, जे लोक आजपर्यंत घराबाहेर पडत नव्हते. ते इतरांच्या फ्लॅटमध्ये कसे घुसू लागले? याचा विचार आता करण्याची गरज आहे.

- Advertisement -

हे वाचा – ‘आता EVM नकोच’ अजित पवारांचा यु टर्न

लोकसभा निवडणुकीच्यावेळी देखील विरोधक एकत्र आले होते. मात्र ते तोंडघशी पडले. जनतेने त्यांना नाकारले. निवडणूक आयोगा सारख्या संवैधानिक रचनेवर शंका उपस्थित करणे म्हणजे जनतेवर अविश्वास दाखविण्यासारखे आहे, असे शेलार यांनी सांगितले. तसेच विरोधक एकत्र येऊन एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

भाजप हा केडरबेस पक्ष असून आमची जनतेशी नाळ जोडलेली आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस जनतेच्या सेवेचे काम करत आहेत, तेच काम पुढे करत राहू, असे देखील शेलार म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -