घरमहाराष्ट्रनाशिकआयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महाशिबिर सुरू

आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महाशिबिर सुरू

Subscribe

शिबिर २३ ऑगस्टपर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार, नावांच्या पडताळणीचीही व्यवस्था

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांसाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आयोजित केलेल्या आयुष्यमान भारत योजनेच्या महाशिबिराचे उद्घाटन शुक्रवारी, १० ऑगस्टला  जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मांढरे यांच्यासह उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, आयुष्यमान भारत योजनेचे नाशिक विभाग प्रमुख डॉ. नितीन पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. तुषार मोरे, जिल्हाप्रमुख डॉ. विपुल चोपडा, पालिका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गायकवाड, पर्यवेक्षक स्वप्नील इंगळे, जेष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी, आरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेविका स्वाती भामरे, शाहीन मिर्जा, रूपाली निकुळे, अर्चना थोरात, प्रियंका घाटे, नगरसेवक अनिल ताजनपुरे, श्याम बडोले, मध्य पश्चिम मंडलाचे अध्यक्ष देवदत्त जोशी, द्वारका मंडलाचे अध्यक्ष सुरेश मानकर, पवन भगुरकर, सुनील देसाई आदी उपस्थित होते.

- Advertisement -

जिल्हाधिकारी यांनी सांगितले की नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन मुलभूत गरजांची पुर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे. या गरजा अपुर्ण असल्या तर देशाच्या विकासाचा वेग मंदावतो आणि या नागारिकांचा भार इतर नागरिकांवर पडतो. तर, आ. फरांदे यांनी योजनेची माहिती दिली. हालाखीच्या परिस्थितीमुळे महागडे उपचार सामान्य नागरिकाला परवडत नाहीत. परिणामी उपचाराअभावी अनेक नागरिकांचे नाहक बळी जातात. अशा व्यक्तींसाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अर्थात आयुष्यमान भारत योजना सुरू केली.

हे शिबिर २३ ऑगस्टपर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे. सर्व नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्यासाठी बी. डी. भालेकर विद्यालयात जावे, असे आवाहनही प्रा. फरांदे यांनी केले. ज्यांना लाभार्थी म्हणून पत्र मिळालेली नाहीत त्यांना लाभार्थ्यांच्या यादीत आपले नावही याठिकाणी बघता येईल. कार्यक्रमाला सोनल दगडे, भास्कर घोडेकर, श्याम बोरदे, रतन काळे, शिवा जाधव, पवन उगले, फिरोज शेख, नामा हाजी, अतुल क्षीरसागर, मंदार ढोमसे, सुनील मोहिते, निखिलेश गांगुर्डे, विजय बनछोडे, सूनम विश्वकर्मा, रूपाली मर्चंडे, इरफान शेख, प्रतीक शुक्ल, पप्पू शेख, विजय काळे, कैलास हदगे, सतीश शेलार, राजश्री हिरे, नयना गांगुर्डे, आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

काय आहे योजना

या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वार्षिक पाच लाखाचा आरोग्य विमा मिळतो. यामुळे कुटुंबातील कुणीही आजारी पडल्यास पाच लाखापर्यंतच्या उपचाराचा खर्च शासन करते.

कोण असेल पात्र

२०११ च्या सामाजिक आर्थिक जातीय जनगणनेनुसार एक सर्वे करण्यात आला होता.या सर्वेनुसार नाशिक जिल्ह्यातील पाच लाख तीन हजार कुटुंबांची प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली होती. या सर्व्हेनुसार निवड झालेल्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कार्ड मिळविण्यासाठी आधार कार्डच्या मुळप्रतीसह झेराँक्स आणि रेशनकार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

योजनेतील रुग्णालयांची यादी

आयुष हॉस्पिटल, अशोका हॉस्पिटल, वोक्हार्ट हॉस्पिटल, सुयोग हॉस्पिटल, श्री साईबाबा हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, शाह हॉस्पिटल, संदर्भ सेवा रुग्णालय, सिक्स सिग्मा हॉस्पिटल, श्री गुरुजी रुग्णालय, शताब्दी हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, नामको कॅन्सर हॉस्पिटल, लाईफ केअर हॉस्पिटल, एच.सी.जी. मानवता प्रायवेट लिमिटेड, शताब्दी हॉस्पिटल, धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (पिंपळगाव), साईसिद्धी हाँस्पिटल (येवला), श्री दत्तकृपा हॉस्पिटल (दिंडोरी), साई श्री हॉस्पिटल (ओझर), डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (आडगाव), जनरल हॉस्पिटल, प्रयास हॉस्पिटल, समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल, सिक्स सिग्मा हॉस्पिटल (मालेगाव), संतकृपा हॉस्पिटल (देवळाली)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -