घरदेश-विदेशचिदंबरम यांची सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

चिदंबरम यांची सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Subscribe

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची सीबीआय कोर्टाने याचिका फेटाळली आहे.

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआय कोर्टाने २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती. सीबीआयच्या राउज अ‍ॅव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, चिदंबरम यांची सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

- Advertisement -

माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सध्या सीबीआय कोठडीत असून त्याप्रकरणी मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही. सीबीआय कोठडीविरोधात चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी त्यांना २१ ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यांचा याप्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला होता. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांची सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.


हेही वाचा – पी. चिदंबरम हिंदू दहशतवाद शब्दाचे ‘जनक’!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -