घरमहाराष्ट्रनाशिकबंदीजनांसह बचत गटांनाही पावले बाप्पा

बंदीजनांसह बचत गटांनाही पावले बाप्पा

Subscribe

मूर्ती खरेदीला सिन्नरकरांचा प्रतिसाद, बचत गटाद्वारे विक्री

कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या शाडूमातीच्या गणेश मूर्ती खरेदीला सिन्नरकरांचा यंदाही मोठा प्रतिसाद लाभतो आहे. तालुक्यातील आशापुर येथील महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांसह महिला विडी कामगारांचे स्टॉल्स असल्याने, मूर्ती विक्रीतून त्यांच्यासह बंदीजनांनाही हा गणेशोत्सव लाभदायी ठरला आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी बचत गटांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतून स्वागत होत आहे. उषा पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली संगीता पाटोळे, सुनीता पाटोळे, मंजूषा पाटोळे, वैशाली पाटोळे, सविता पाटोळे, आशा पाटोळे, आशा शिंदे, कौसाबाई पाटोळे आणि जयश्री पाटोळे व कामगार महिलांनी एकत्र येत कामगार बचत गटाची स्थापना केली. बांधकाम आणि कुटुंब यापलिकडे फारसे काही माहिती नसलेल्या महिलांनी बचत गटाद्वारे जिल्हा स्तरापर्यंत आपला ठसा उमटवला आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी महिलांनी शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती विक्रीचा निर्णय घेतला. पंचशीला बागूल यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. नाशिक रोड येथील कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या मूर्तींना बाजारपेठ मिळेल आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला पाठबळ लाभेल, या दुहेरी हेतूने महिलांनी गणेशमूर्ती विक्रीचे काम हाती घेतले.

भाविकांसह मंडळांकडून मूर्ती आरक्षित

महिला बचत गटांनी ठाणगाव, पाडळी, हिवरे, पिंपळे, आशापूर येथे विक्री केंद्र सुरू केले आहेत. आणलेल्या मूर्तींची विक्री झाली असून, बहुतांश भाविकांनी आगाऊ पैसे देत मूर्ती आरक्षित केली आहे. या प्रतिसादामुळे महिलांना अधिक प्रोत्साहन मिळते आहे. पर्यावरणाला घातक रंग आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न वापरण्याचे आवाहनदेखील या महिला करत आहेत. त्यांच्या विनंतीला ग्रामस्थांचाही प्रतिसाद लाभतो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -