घरमुंबईअपघाताचा फटका विद्यार्थ्यांनाही

अपघाताचा फटका विद्यार्थ्यांनाही

Subscribe

विद्यार्थ्यांनी आणि सिनेट सदस्यांनी केलेल्या या मागणीनंतर परीक्षा व मूल्यमापन विभागाने परीक्षा भवनात तातडीने बैठक बोलावून पुन्हा परीक्षेला बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत मंगळवारी सकाळी अंधेरी येथे पूल कोसळल्यामुळे आणि सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील वाहतूक पूर्णत: कोलमडली. त्याचा फटका विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना बसला असून अनेकांना परीक्षा केंद्रावर पोहचता न आल्याने परीक्षा बुडाल्याचे वृत्त मंगळवारी समोर आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आता विद्यापीठाकडे धाव घेतली असून त्यांना परीक्षेला बसण्याची पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने घेतला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांनी अखेर मोकळा श्वास सोडला.

काय घडले नक्की?

मुंबई विद्यापीठात सध्या उन्हाळी सत्र परीक्षा सुरु असून मंगळवारी एमएसस्सी अभ्यासक्रमाच्या झुओलॉजी आणि केमेस्ट्री अभ्यासक्रमाची प्रात्यक्षिक परीक्षा होती. परंतु मंगळवारी सकाळी सुरु झालेल्या पावसामुळे आणि अंधेरी येथे पादचारी पूल कोसळल्याने मुंबईतील रस्त्यावरील वाहतूक आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे अनेक विद्याार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता आलेले नाही. अनेकांना या परीक्षेला लेटमार्क सहन करावा लागला. पण परीक्षा हुकण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्य आणि मुंबई विद्यापीठाकडे धाव घेत याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली. युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी ही याप्रकरणी तातडीने परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक अर्जुन घाटुळे यांच्याशी संपर्क साधत या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून नव्याने संधी देण्याची मागणी केली.

- Advertisement -

तातडीने घेतलेल्या बैठकीत निर्णय

दरम्यान, विद्यार्थ्यांनी आणि सिनेट सदस्यांनी केलेल्या या मागणीनंतर परीक्षा व मूल्यमापन विभागाने परीक्षा भवनात तातडीने बैठक बोलविली. त्यानंतर जवळपास सर्वच परीक्षा केंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेत परीक्षा विभागाने यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार अनेक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचणे शक्य झालेले नाही. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार असून या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव विनोद मळाळे दिली. तर ही परीक्षा केव्हा घेण्यात येईल, यासंदर्भातील परिपत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे यावेळी मळाळे यांनी स्पष्ट केले. परीक्षा विभागाच्या या निर्णयामुळे परीक्षा बुडालेल्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पालकांची तारांबळ

मंगळवार सकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळे अनेक शाळा प्रशासनाने सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा लवकर सोडून देण्याचा निर्णय घेतला. शाळा प्रशासनाने अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे पालक वर्गांची एकच धावपळ उडाली. त्यातच अनेक स्कूल बस चालकांनी ठरलेल्या वेळेतच स्कूल बस चालविणार असल्याचे जाहीर केल्याने मुंबई व उपनगरातील पालक वर्गांची एकच ताराबंळ उडाल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -