घरमहाराष्ट्रनाशिकआम आदमीचे लक्ष्य जिल्ह्यातील सहा मतदारसंघ

आम आदमीचे लक्ष्य जिल्ह्यातील सहा मतदारसंघ

Subscribe

आम आदमी पार्टीच्या वतीने राज्यात सुमारे ५५ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागा लढविण्यासाठी पक्ष तयारी करीत आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती काही दिवसांपुर्वीच झाल्या असून नाशिक मध्य, पूर्व, पश्चिम, दिंडोरी, नांदगाव आणि निफाड या मतदार संघात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने या मतदार संघात निवडणूक लढवायचीच असा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा लढविल्या होत्या. त्यात आलेल्या दारुण अपयशानंतर राज्यातील कोणत्याही निवडणुका आम आदमी पार्टीने लढविल्या नव्हत्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीबरोबर आम आदमी पार्टी असेल असे बोलले जात होते. परंतु ही चर्चाच ठरली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मात्र आम आदमी पार्टी नशिब आजमावून बघणार आहे. राज्यात ५५ जागांवर लढण्यासाठी पार्टीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील राज्य कार्यकरिणीतील पदाधिकार्‍यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी राज्य संयोजक रंगा राचुरे, उपसंयोजक किशोर मंद्यान, सचिव धनंजय शिंदे, युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे, मुकूंद केतकर, डॉ. सुनील गावीत आदींसह अन्य काही पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक शहरातील मध्य, पूर्व आणि पश्चिम मतदार संघ तसेच ग्रामीण भागातील देवळाली, दिंडोरी, बागलाण, नांदगाव आणि निफाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी इच्छा दर्शविली आहे. यातील शहरातील तीनही तसेच नांदगाव आणि निफाड मतदार संघात निवडणूक लढविण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

- Advertisement -

मुलाखतींपूर्वी हितचिंतकांचे मेळावे-

मुलाखतींपूर्वी इच्छुकांना आपापल्या मतदार संघात हितचिंतक, कार्यकर्ता मेळावा घेण्याचे सूचित केले होते. त्यादृष्टीने ठिकठिकाणी मेळावे घेण्यात आले आहेत. या मेळाव्यांमधून हितचिंतक आणि कार्यकर्त्यांचे विचार ऐकून घेण्यात आलेत.

अशी आहेत इच्छुकांची नावे-

पूर्व- जितेंद्र भावे, योगेश कापसे, वामन सांगळे,
मध्य- अ‍ॅड. बंडूनाना डांगे, अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, जगबीरसिंग.
पश्चिम- विकास पाटील, एकनाथ सावळे, डॉ. जयवंत महाले, जगमेरसिंग खालसा, नकुल बोराडे.
निफाड- उत्तम निरभवणे.
नांदगाव- विशाल वघडघुले.
दिंडोरी- पी. के. बागूल
देवळाली- रवी बागूल.
बागलाण- प्रा. योगेश मोहन

- Advertisement -

येत्या मंगळवारी वा बुधवारी पहिली यादी-

पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर अन्य पक्षातून आम आदमीकडून निवडणूक लढविण्यासाठी कोण कोण तंयार आहे याचीही चाचपणी राज्य कार्यकारिणी सदस्यांनी केली आहे. त्या दृष्टीने आता दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी किंवा बुधवारी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिध्द करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य मीडिया टिम सदस्य अभिजीत गोसावी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -