घरमहाराष्ट्रमशाल महोत्सवात उजळला प्रतापगड !

मशाल महोत्सवात उजळला प्रतापगड !

Subscribe

प्रतापगडावरील आई भवानीच्या स्थापनेस यंदा ३५९ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत मंगळवारी रात्री गडावर ३५९ मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी हजारो शिवभक्तांनी उपस्थिती लावली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि साक्षात आई भवानीच्या स्थापनेमुळे पुनित झालेल्या हिंदवी स्वराज्यातील एक महत्वपूर्ण स्थान म्हणजे प्रतापगड, असे मानले जाते. शिवरायांनी भोरप्याच्या डोंगराला तट, बुरूजांचे शेला पागोटे चढवून स्वराज्यावर चालून आलेल्या उन्मत अफझलखानाचा येथेच कायमचा काटा काढला. या स्फूर्तीदायी घटनेने हिंदुस्थानच्या इतिहासाला एक नवी कलाटणी मिळाली. हा पराक्रम जिच्या कृपाशीर्वादाने प्रत्यक्षात आला तिचे स्मरण म्हणून शिवरायांनी प्रतापगडावर आई भवानीचे मंदिर बांधून त्या ठिकाणी आदिशक्तीची स्थापना केली.

- Advertisement -

प्रतापगड निवासिनी आई जगदंबेच्या स्थापनेला २०१० साली ३५० वर्षे पूर्ण झाली. या घटनेचे औचित्य साधून प्रतापगडावरील स्थानिक भूमिपुत्र चंद्रकांत उतेकर तथा अप्पा यांच्या संकल्पनेतून प्रतापगडावर प्रथम त्यावेळी ३५० मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर हा महोत्सव सुरू झाला. तो सर्वांचे आकर्षण ठरत असल्याने अलोट गर्दी पहायला मिळते. प्रतापगडावर घटस्थापनेपासून दसर्‍यापर्यंत रोज विविध कार्यक्रमांचे उत्सव समितीतर्फे आयोजन करण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -