घरदेश-विदेशपहिलं राफेल उडालं खरं, पण चाकाखाली लिंबू घेऊन!

पहिलं राफेल उडालं खरं, पण चाकाखाली लिंबू घेऊन!

Subscribe

गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या राफेल करार घोटाळ्याचं भूत भाजपच्या मानगुटावर बसलं होतं, त्या राफेल करारातलं पहिलं राफेल आज भारताच्या ताफ्यात दाखल झालं. खुद्द संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वत: फ्रान्समध्ये जाऊन राफेची ‘डिलिव्हरी’ घेतली. पण यावेळी एका गोष्टीवरून मात्र चर्चा सुरू झाली. ती म्हणजे राजनाथ सिंहांनी फ्रान्समध्ये राफेल ठेवलेल्या तळावरच राफेल विमानाची केलेली पूजा. दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजा करण्याची भारतीय पद्धत आहे. मात्र, राजनाथ सिंहांनी थेट फ्रान्समध्येच राफेलची पूजा केल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. यावेळी विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवल्यामुळे ही श्रद्धा की अंधश्रद्धा? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

- Advertisement -

दसऱ्याचा मुहूर्त साधून राजनाथ सिंह यांनी पहिलं राफेल भारताच्या ताफ्यात घेण्याचा योग जुळवून आणला. मात्र, यावेळी त्यांनी परंपरेप्रमाणे शस्त्रपूजा केली. मात्र, त्यासोबतच त्यांनी अत्याधुनिक अशा राफेल विमानावर नारळ ठेवला आणि विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवले. यावरून आता नेटिझन्समध्ये संताप व्यक्त होत असून ट्विटरवरच ते हा संताप व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -