घरदेश-विदेशबिहारमध्ये महिलेला 'या' शुल्लक कारणांसाठी दिला तीन तलाक

बिहारमध्ये महिलेला ‘या’ शुल्लक कारणांसाठी दिला तीन तलाक

Subscribe

सततच्या दबावामुळे या महिलेने आपल्या पतीला दिला तलाक

बिहारची राजधानी पटना येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला चक्क तीन वेळा तलाक दिला आहे. हा तलाक शुल्लक कारणांसाठी दिल्याचे उघड झाले आहे. तलाक दिल्यानंतर या महिलेचे असे म्हणणे आहे की, तिचा नवरा तिच्यावर छोटे आणि वेगवेगळे कपडे घालण्यासाठी दबाव आणायचा तसेच तो तिला मद्यप्राशन करण्यासाठी देखील जबरदस्ती करायचा. या सततच्या दबावामुळे या महिलेने आपल्या पतीला तलाक दिला आहे.

- Advertisement -

लग्नानंतर पत्नीने मॉर्डन रहावे अशी पतीची इच्छा

एएनआयच्या वृत्तानुसार, २०१५ साली या महिलेचे लग्न झाले होते. दोघांच्या लग्नानंतर ते काही दिवसांनी दोघे दिल्लीला रवाना झाले. काही महिन्यांनंतर तिच्या पतीने तिला मॉर्डन राहण्यासाठी हट्ट केला. याकरिता त्याने त्याच्या पत्नीकडे छोटे कपडे घालावे, क्लबमध्ये जावे आणि मद्यपान करावे अशी त्यांची इच्छा व्यक्त केली. परंतु या महिलेले असे राहणे आवडत नसल्याने तिने आपल्या पतीला नकार दिला. जेव्हा तिने ऐकले नाही, तेव्हा तिला तिच्या पतीकडून दरोरोज मारहाण केली गेली.

तीन तलाक देऊन संबंध संपवले

काही दिवसांपूर्वी पतीने तिला घर सोडण्यास सांगितल्यावर तिने नकार दिला तेव्हा त्याने तीन तलाक देऊन संबंध संपवले होते. यावेळी पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर महिला आयोगानेही पीडितेच्या पतीला नोटीस पाठविली होती.


बिहारमधील पूरात ‘या’ मॉडेलने केलं फोटोशूट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -