घरमुंबईराज्यातील वीज ग्राहकांचाही जाहीरनामा

राज्यातील वीज ग्राहकांचाही जाहीरनामा

Subscribe

राज्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक आणि कृषी वीज ग्राहकांचे प्रतिनिधीत्व करणारा जाहीरनामा मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेमार्फत यंदाच्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मांडण्यात आला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांच्या अपेक्षापुर्तीचा जाहीरनामा या निमित्ताने मांडण्यात आला आहे. राज्यातील महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध वर्गवारीतील एकूण २.५ कोटीहून अधिक ग्राहक आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये अदानी, बेस्ट व टाटा यांच्या कार्यक्षेत्रात अंदाजे ४० लाख ग्राहक आहेत. या सर्व वीज ग्राहकांच्या समस्या आणि अपेक्षा या संबंधित वितरण परवानाधारक, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग आणि प्रामुख्याने महाराष्ट्र सरकार यांच्याशी जोडलेल्या आहेत. वीज क्षेत्रातील शासकीय मालकीमुळे अनेक निर्णय राजकीय व राज्य सरकार कडून होतात.

राज्यातील सर्व ग्राहकांच्या अपेक्षा आणि अपेक्षापूर्ती यांचा संबंध थेट महाराष्ट्र सरकारशी जोडलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्व राजकीय पक्ष, या पक्षांचे उमेदवार तसेच अन्य विविध संघटनांचे व अपक्ष उमेदवार या सर्वांच्या माहितीसाठी व कार्यवाहीसाठी महाराष्ट्रातील वीज ग्राहकांचा जाहीर अपेक्षानामा सादर व प्रकाशित करीत आहोत. त्याचबरोबर राज्यातील सर्व उमेदवार, संबंधित संघटना, राजकीय पक्ष व नेते यांनी या अपेक्षानाम्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशीही अपेक्षा व मागणी या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

- Advertisement -

काय आहे अपेक्षानाम्यात
राज्यातील सर्व ४३ लाख लघुदाब शेतीपंप वीज ग्राहकांचे वीज दर २.५ पट ते ३ पट झालेले आहेत. शेतीपंप वीज ग्राहकांचे सवलतीचे रास्त वीजदर त्वरित निश्चित व जाहीर करण्यात यावेत अशी अपेक्षा कृषीपंप ग्राहकांबाबत मांडण्यात आली आहे. सर्व शेतीपंपांची वीज बिले तपासून दुरुस्त व अचूक करून देण्यात यावीत अशीही अपेक्षा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांच्या सोयीसाठी व हितासाठी दरमहा १०१ ते २०० युनिट्स वीज वापरासाठी रास्त वीजदराची स्वतंत्र वर्गवारी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -