घरदेश-विदेशट्रॅकमॅनचे प्रसंगावधान; हजारो प्रवाशांचे वाचले प्राण

ट्रॅकमॅनचे प्रसंगावधान; हजारो प्रवाशांचे वाचले प्राण

Subscribe

ट्रॅकमनने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे हजारो प्रवाशांचे जीव वाचले आहेत. गुजरातमधील वेदच्छा ते नवसारी दरम्यान ७ जुलैच्या मध्यरात्री ओव्हरहेड वायर तुटल्याचे ट्रॅकमन तरूणंजय कुमार यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नवसारी रेल्वे कार्यालयात याची माहिती दिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

भरधाव धावणारी एक्सप्रेस आणि अशातच ओव्हरहेज वायर तुटलेली. केवळ विचारानेच अंगावर काटा उभा राहिला ना? असाच काहीसा प्रकार गुजरातमधील वेदच्छा आणि नवसारी या रेल्वेमार्गावर झाला असता. पण, ट्रॅकमॅनने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे हजारो रेल्वे प्रवाशांचे जीव वाचले आहेत. ओव्हरहेड वायर तुटल्याचे ट्रॅकमॅनच्या लक्षात आले नसते तर? विचारत न केलेला बरा. तरूणंजय कुमार नावाचा ट्रॅकमन हा हजारो प्रवाशांसाठी देवदूत ठरला आहे. वेदच्छा ते नवसारी दरम्यान तरूणंजय कुमार हा ७ जुलैच्या दरम्यान रात्री ड्युटीवर होता. त्यावेळी १२.३० वाजताच्या दरम्यान तरूणंजय कुमारच्या ओव्हरहेड वायर तुटल्याचे लक्षात आले. त्याने अजिबात वेळ न दवडता संबंधित प्रकारची माहिती नवसारी रेल्वे कार्यालयात कळवली. त्यामुळे सर्व गाड्यांना याची सुचना देत त्या वेळीच थांबवण्यात आल्या. ओव्हरहेड वायर दुरूस्त झाल्यानंतरच ही वाहतूक सुरू करण्यात आली. तरूणंजय कुमारने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. तरूणंजय कुमार हा पश्चिम रेल्वेचा कर्मचारी आहे. त्याचा या कामाचे पश्चिम रेल्वेने ट्विट करत कौतुक केले आहे. तरूणंजय कुमारने प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठा अनर्थ झाला असता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -