घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांनी चक्क एटीएम पळवले

पिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांनी चक्क एटीएम पळवले

Subscribe

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण येथे अज्ञात चोरांनी चक्क एटीएम मशीन मोटारीत घालून पळवून नेल्याचे घटना समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण येथे अज्ञात चोरांनी चक्क एटीएम मशीन मोटारीत घालून पळवून नेल्याचे घटना समोर आली आहे. एटीएममध्ये १६ लाख ९६ हजार रोख रक्कम होती, अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. घटना सीसीटीव्हीत कैद होण्याच्या अगोदरच चोरांनी सीसीटीव्हीवर स्प्रे मारला होता. त्यामुळे त्यात घटना कैद झाली नाही. अद्याप दोन्ही चोर फरार असून त्यांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण मधील चंद्रश्री कॉप्लेक्स येथील गाळा क्रमांक अकरात असणारे एचडीएफसी बँकेचे एटीएमवर चोरांनी डल्ला मारला आहे. दिवसभर अज्ञात दोन चोरांनी टेहळणी केली, मध्यरात्रीच्या सुमारास स्कॉर्पिओमधून येत एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न चोरांनी केला. मात्र, तो फसल्याने चक्क एटीएमला दोरी गुंडाळून ते मोटारीत घालून पळवून नेले आहे. दरम्यान, एटीएममध्ये सीसीटीव्ही होता त्यावर चलाख चोरांनी स्प्रे मारला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे संबंधित घटना आणि अज्ञात व्यक्ती हे सीसीटीव्हीत कैद झालेले नाहीत. एटीएम मशीन आणि त्यामधील रोख रक्कम अशी १८ लाख ९८ हजार रुपये चोरांनी पळवून नेले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा एटीएम मशीनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अनेकदा एटीएम मशीन असलेल्या ठिकाणी मध्यरात्री सुरक्षा पुरवली जात नसल्याचे वारंवार समोर आले आहे. अज्ञात चोरांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शरद पवार आणि मुख्यमंत्री दिल्लीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -