घरमुंबईदाट धुक्यातही 'आयमेथॉन'मध्ये धावले कल्याणकर

दाट धुक्यातही ‘आयमेथॉन’मध्ये धावले कल्याणकर

Subscribe

या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सुमारे दीड हजार स्पर्धक त्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे दाट धुके असतानाही स्पर्धकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.

कल्याण इंडियन मेडीकल असोसिएशनने (आयएमए) आयोजित केलेल्या ‘आयमेथॉन-2019’ या मॅरेथॉन स्पर्धेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सुमारे दीड हजार स्पर्धक त्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे दाट धुके असतानाही स्पर्धकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.

विशेष मुलांसाठी मदत 

कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा ३ गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, मिस्टर एशिया बॉडीबिल्डर्स स्पर्धेतील कांस्यपदक विजेता संतोष चाहल आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या वेगवेगळ्या स्पर्धांचा प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून २ लाख रुपयांची आर्थिक मदत ‘सदिच्छा’ या विशेष मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या कल्याणातील शाळेला करण्यात आली.

या स्पर्धेला मिळत असणारा वाढता प्रतिसाद पाहता येत्या काळात मुंबई मॅरेथॉन, ठाणे मॅरेथॉनप्रमाणेच या ‘आयमेथॉन’चा नावलौकिक होईल.
डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -