घरमुंबईराष्ट्रपती राजवटीवर 'राज ठाकरें'ची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रपती राजवटीवर ‘राज ठाकरें’ची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रपती राजवटीवर 'राज ठाकरें'नी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. हा नतद्रष्टांमुळे खेळ खंडोबा झाला आहे’,अशी पहिली प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. राष्ट्रपती राजवटीवर राज ठाकरेंनी आपली पहिली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. हा नतद्रष्टांमुळे खेळ खंडोबा झाला आहे’.

- Advertisement -

आधी भाजप, नंतर शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील सत्तास्थापनेत अपयश आल्यानंतर अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी सोमवारी संध्याकाळी सत्तास्थापनेसाठी तिसरा मोठा पक्ष म्हणून आमंत्रित केलं होतं. मात्र, त्या मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसने देखील राज्यपालांची भेट घेऊन दोन दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली. ही मुदतवाढ देणं शक्य नसल्यामुळे अखेर राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यासंदर्भातल्या आदेशाच्या पत्रावर स्वाक्षरी केली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून काय भूमिका घेतली जाणार? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

काय असते राष्ट्रपती राजवट?

राष्ट्रपती राजवटीदरम्यान राज्याची सर्व सूत्र राष्ट्रपतींच्या हाती असतात. त्यांच्या अधिकारात राज्यपाल ही सर्व सूत्र सांभाळत असतात. या कालावधीमध्ये मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ अशी कोणतीही संस्था अस्तित्वात राहणार नाही. सगळे निर्णय हे राज्यातल्या मुख्य सचिवांच्या मदतीने थेट राष्ट्रपतींच्या नावाने घेतले जातील.

- Advertisement -

हेही वाचा – अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -