घरट्रेंडिंग'#ResignDevendraFraudnavis': मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नेटकरी संतापले

‘#ResignDevendraFraudnavis’: मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नेटकरी संतापले

Subscribe

महाराष्ट्रातील राजकारणाला शनिवारी पहाटे एक वेगळं वळणं मिळालं आहे. याचं पार्श्वभूमीवर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. या पदभार स्वीकारण्याअगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानभवनात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच हा पदभार स्वीकारल्यानंतर काही वेळातच ट्विटवर #ResignDevendraFraudnavis असं ट्रेंड होण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री साहायत्ता निधीच्या पहिल्या चेकवर फडणवीस यांनी पहिली सही केली. ऐवढं सगळं होऊनही नेटकरी शांत बसले नाहीत. त्यांनी सोशल मीडियावरून त्यांचा संताप व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असं नेटकऱ्यांनी सांगितलं. तसंच सोशल मीडियावर फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

 

राज्यातील सत्तापेचावर सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला असून उद्या सकाळी १०:३० वाजता सुनावणी होणार आहे. आता सुप्रीम कोर्ट उद्या काय निकाल देणार यावर सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.


हेही वाचा – सोशल मीडियावर होतय अनोख फोटोशूट व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -