घरमहाराष्ट्रनाणार प्रकल्प लादणार नाही - मुख्यमंत्री

नाणार प्रकल्प लादणार नाही – मुख्यमंत्री

Subscribe

स्थानिकांचा विरोध डावलून नाणार प्रकल्प लादणार नाही अशी मवाळ भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच घेतली आहे. विधीमंडळामध्ये बोलताना त्यांनी नाणार लादणार नसल्याची ग्वाही दिली.

नाणारचा प्रकल्प लादणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये दिली. नागपुरात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच नाणार प्रश्नी मवाळ भूमिका घेतल्याचे पाहायाला मिळत आहे. रत्नागिरीतील नाणार येथे तेलशुद्धीकरण कारखाना उभारण्यात येणार आहे. त्यासाठी परदेशी कंपन्यांशी करार देखील करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकल्पाला स्थानिकांसह शिववसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपसह असलेले खासदार नारायण राणे यांनी देखील विरोध केला आहे. नाणारला विरोध असला तरी केंद्रीय स्तरावर सरकार परदेशी कंपन्यांशी करार करत आहे. पण, पावसाळी अधिवेशनामध्ये नाणारचा प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण पूरक असला तरी स्थानिकांचा डावलून प्रकल्प लादणार नाही अशी मवाळ भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री

प्रकल्पाशी संबंधित सर्वांशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. शिवाय, आयआयटी मुंबई, निरी सारख्या संस्थांना प्रकल्पाच्या परिणामांचा अभ्यास करण्याचे काम देण्यात आले आहे. आमची प्रत्येकाशी चर्चा करण्याची देखील तयारी आहे. समृद्धी महामार्गाला देखील विरोध होता. पण चर्चेने प्रश्न सोडवला. ९३ टक्के जमिन सर्वसहमतीने मिळवण्यात सरकार यशस्वी झाल्याचे उदाहरण फडणवीस यांनी दिले. नाणार प्रकल्पानिमित्त ३ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. देशातील कोणत्याही प्रकल्पाच्या तुलनेत ही गुंतवणूक सर्वाधिक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. तसेच राज्य सरकारच्या पुढाकाराने अनेक लोकांशी चर्चा करून नाणार आणि लगतच्या भागात जागा संपादन करून रिफायनरीचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे नाणारला जर स्थानिकांचा विरोध असेल तर स्थानिकांचा विरोध डावलून प्रकल्प लादणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात बोलताना दिली.

- Advertisement -

नाणारला विरोध

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे प्रस्तावित तेलशुद्धीकरण कारखाना उभारण्यात येणार आहे. पण स्थानिकांनी मात्र त्याला कडाडून विरोध केला आहे. ऐरवी शांत असलेले कोकण मात्र नाणारच्या प्रश्नावरून धगधगत आहे. निसर्गसंपन्न कोकणात नाणार नको अशी मागणी आता कोकणातून जोर धरू लागली आहे. शिवाय, अधिवेशनात देखील कोकणातील जनतेने नाणार नको अशी भूमिका घेत विधीमंडळावर मोर्चा काढला. प्रकल्पानिमित्त कोकणात ३ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक येणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. पण, स्थानिकांनी मात्र नाणार नकोची भूमिका घेतली आहे. शिवाय शिवसेना , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नारायण राणे यांनी देखील नाणार प्रकल्पाला विरोध केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -